Viral Video : आई आणि मुलाचे नाते हे जगावेगळे असते. या नात्यात प्रेम, काळजी आणि जिव्हाळा असतो. आई आपल्या मुलांच्या आनंदासाठी वाट्टेल ते करते. त्यांच्या सुखासाठी झटते. मुलं जर दु:खात असेल किंवा अडचणीत असेल ती सुद्धा दु:खी होते आणि मुलांना अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. देवाला ती फक्त आपल्या मुलांचं चांगलं व्हावं, एवढंच मागते. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण आग लागलेल्या इमारतीत अडकलेला दिसत आहे आणि त्याची आई आई तिच्या मुलासाठी प्रार्थना करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

मुलगा मरणाच्या दारातून परतला

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एका इमारतीला आग लागलेली दिसेल. या इमारतीत अडकलेल्या लोकांना सुरक्षा रक्षत बाहेर काढताना दिसत आहे. इमारतीच्या खाली लोकांची गर्दी दिसून येत आहे. या गर्दीत एक आई देवाला प्रार्थना करताना दिसत आहे. तिचा मुलगा या इमारतीत अडकला आहे. पुढे या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की सुरक्षा रक्षक हॅलिकॉप्टरच्या मदतीने त्या तरुणाला इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरून बाहेर काढताना दिसते. तरुण सुरक्षित हॅलिकॉप्टरमध्ये बसताच खाली उभे असलेले लोक टाळ्या वाजवताना दिसतात. प्रार्थना करणारी आई भावुक झालेली दिसते. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. व्हिडीओवर लिहिलेय, “देवाचं पण काही चालत नाही एका आईच्या ताकतीपुढे”

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

marathi_parva या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सर्वप्रथम अभिनंदन हेलिकॉप्टर पायलटचे” तर एका युजरने लिहिलेय, “आईचे ऐकले देवाने” आणखी एका युजरने लिहिलेय, “आई….. सगळे विषय इथे येऊन थांबतात” एक युजर लिहितो, “म्हणून म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी” तर एक युजर लिहितो, “आई ती आईच असते देवाला पण आई ची गरज असते म्हणुन तिची प्रार्थना कधी वाया जात नाही आपल्या लेकरासाठी” अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader