ख्रिसमसचा दिवस हा जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २५ डिसेंबरला हा दिवस साजरा होत असला तरीही पुढील आठवडाभर त्याचे सेलिब्रेशन सुरु असते. इंटरनेटवर जगभरातील सेलिब्रेशनचे अनेक फोटो आणि व्हिडियो व्हायरल होत आहेत. त्यामध्ये एक व्हिडियो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडियो आहे कॅनडातील शालेय मुलांचा. ही मुले ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी गाणे म्हणत असल्याचे त्यामध्ये दिसत आहे. पण ते कोणतीही ख्रिश्चन प्रार्थना किंवा इतर गाणे गात नसून ते एक भारतीय भजन म्हणत आहेत. ‘ओम जय जगदिश हरे’ हे प्रसिद्ध भजन ते गात असल्याचे या व्हिडियोमध्ये दिसत आहेत. ख्रिसमसच्या दिवशी भारतीय भजन म्हणत असल्याने हा व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Om jai jagdish hare aarti sung by Canadian kids at a Christmas https://t.co/FmoCr0EaS6 Planet,One People. pic.twitter.com/3aiXva5s8V
— Raveena Tandon (@TandonRaveena) December 25, 2018
हा व्हिडियो अभिनेत्री रविना टंडन हिने आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला असून त्यापुढे तिने, One planet, one people असे लिहीले आहे. शाळेच्या ड्रेसमध्ये आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे भजन गाणारे हे चिमुकले नेटीझन्सची पसंती मिळवत आहेत. ६९ हजार जणांनी आतापर्यंत हा व्हिडियो पाहिला असून ३ हजारहून अधिकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. काहींनी हा व्हिडियो फेक असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी कॅनडामध्ये विविध धर्माच्या मुलांनी सामुहिकपणे भारतीय भजन म्हटले असल्याने या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. या भजनाला भारतीय वाद्यांची साथ देण्यात आल्याचेही व्हिडियोमध्ये दिसत आहे. त्यात तबला, सितार, हार्मोनियम आणि बासरी वाजवणारे कलाकार दिसत आहेत.