जगभरात खाद्यप्रेमींची कमतरता नाही, आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांसाठी लोक कुठेही जायला तयार असतात. त्यासाठी ते वेळेचा आणि पैशांचा विचार करत नाहीत. शिवाय आजकाल सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात, ज्यामध्ये लोक आपल्या चवीचे पदार्थ खाण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जात असतात. याबाबतच्या पोस्टदेखील हे खवय्ये सोशल मीडियावर शेअर करत असतात.

हेही पाहा- Video: रील बनवण्यासाठी रेल्वे लाईनच्या खांबावर चढण्याचा मोह नडला, क्षणात अंगातून धूर येऊ लागला अन्…

railway nir
“५ रुपयांसाठी एवढी मारहाण?”, एका चुकीमुळे पॅन्ट्री बॉयला मॅनेजरने धू धू धुतला, रेल्वेतील धक्कादायक Video Viral
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
indian railways shocking video
ट्रेनमधून आरामात झोपून प्रवास करताय? मग ‘हा’ धक्कादायक VIDEO एकदा पाहाच, तुमच्याबरोबर घडू शकते अशी घटना
young woman attempted suicide
जीव एवढा स्वस्त असतो का? रागाच्या भरात फलाटावरून उडी मारत तरुणीने केला आत्महत्येचा प्रयत्न; पण तो देवासारखा आला अन्… पाहा थरारक VIDEO
Shocking video two man fight in running local dore in Virar local video viral on social media
VIDEO: “एक चूक अन् खेळ खल्लास” विरार लोकलच्या दरवाजात दोन पुरुषांमध्ये भयंकर हाणामारी; मान धरली अन् थेट…
Shocking video Mumbai Local Women Fought With Each Other At Dombivli Railway Station
“महिलांना आता पुरूषांची नाही महिलांचीच भिती” डोंबिवली रेल्वे स्टेशनवरील खतरनाक VIDEO होतोय व्हायरल
Thief calmly hangs from window of moving train in dangerous stunt
‘एक चूक अन् खेळ खल्लास!’ सुसाट वेगाने धावणाऱ्या रेल्वेच्या खिडकीत निवांतपणे लटकतोय हा चोरटा; जीवघेण्या स्टंटबाजीचा Video Viral
disgusting dirty video of tea in train goes viral
“जीव घेणार का आता?” ट्रेनमध्ये चहा बनवणाऱ्यानं अक्षरश: हद्दच पार केली; ट्रेनमध्ये चहा पिणाऱ्यांनो VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

मात्र, सध्या अशा एका खाद्यप्रेमीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे तो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेलच शिवाय हसू आवरणही कठीण होणार आहे. कारण या व्हिडीओत दिसणारा खाद्यप्रेमी हा एका ट्रेनचा ड्रायव्हर आहे असून तो चक्क रेल्वे थांबवून मासे खरेदी करण्यासाठी गेला आहे. त्यामुळे या व्हिडीओवर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. शिवाय याला खरा मासेप्रेमी म्हणायचं अशा कमेंट नेटकरी करत आहेत.

हेही पाहा- Video: झाडाखाली चहा पित उभ्या राहिलेल्या व्यक्तीवर अचानक ओढावलं संकट, जीवाच्या भीतीने पळाला अन्…

आपण अनेक अशा लोकांना पाहिलं आहेजे बाईक किंवा कारने लांबचा प्रवास करून आपले आवडते खाद्यपदार्थ खाण्यासाठी विविध ठीकाणी जात असतात. परंतु तुम्ही कधी ट्रेन ड्रायव्हरने ट्रेन थांबवून मासे खरेदी केल्याचं तुम्ही पाहिले नसेल मात्र, या व्हिडीओमध्ये तुम्हाला अशा मासेप्रमी ड्रायव्हरचे दर्शन घडणार आहे.

व्हिडिओमध्ये एक ड्रायव्हर ट्रेन फाटकातच उभी करतो आणि मासे घेण्यासाठी ट्रेन ट्रॅक शेजारी असलेल्या माशांच्या दुकानात जाताना दिसत आहे. या रेल्वे ड्रायव्हरचा व्हिडिओ @HasnaZarooriHai या ट्विटर अकाऊंटवरुन शेअक करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना ट्विटरधारकाने मजेशीर कॅप्शन दिलं आहे. त्याने लिहलं आहे की, ‘हे साहेब त्यांची गाडी पार्क करून मासे खरेदी करण्यासाठी गेले होते, पण त्यांचे वाहन कोणते आहे के पाहा.’

हा व्हिडीओ आतापर्यंत ३० हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर १ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी हा खरा मासेप्रेमी असल्याचं म्हटलं आहे तर एका नेटकऱ्याने लिहलं आहे, ‘ट्रेन ड्रायव्हरचं बरोबर आहे आत्मा तृप्त झाला तरच रेल्वे व्यवस्थित चालवता येईल’

Story img Loader