सोशल मीडियावर प्राण्यांचे व्हिडिओ नेटकरी आवडीने बघतात. जंगलाचा राजा सिंह याची चेष्टा करण्याची तर कोणी हिंमतही करु शकत नाही. कारण सिंहाची चेष्टा करणं म्हणजे मृत्यूला बोलावणं हे सर्वच प्राण्यांना समजतं. पण आता एक असा व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक खोडकर कोल्हा झोपलेल्या सिंहाची चक्क शेपूट खेचताना दिसतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होतोय. भारतीय वन अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. व्हिडिओमध्ये जंगलात एका झाडाखाली सिंह आराम करताना दिसत आहे. तेवढ्यात मागून चोरपावलांनी कोल्हा येतो आणि सिंहाची शेपूट खेचून पळून जातो. दचकून सिंह उठतो, इकडे तिकडे बघतो पण सिंह उठेपर्यंत कोल्हा तिथून पसार झालेला असतो.


हा मजेदार व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात ‘लाइक’ केला जातोय.