सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची अनेकांची स्वप्ने असतात. पण हे स्वप्न प्रत्येकाचंच पूर्ण होत नाही. सैनिक सीमेवर जीवाची बाजी लावून देशाचं संरक्षण करतात. पण हा सैनिक जेव्हा देशसेवा करुन पुन्हा एकदा घरी परततो तेव्हा प्रत्येकाचं ऊर अभिमानाने भरुन येतं. असाच एक हृदयस्पर्शी क्षण स्वातंत्र्यदिनानिमित्त सोशल मीडियावर लोकांनी शेअर केला आहे. जे पाहून तुम्हालाही अभिमान वाटेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वातंत्र्यदिनानिमित्त सोशल मीडियावर लोकांनी अनेक व्हिडीओ शेअर केले होते पण असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्याने सर्वांनाच आनंद दिला. हा व्हिडीओ देशाचं रक्षण करून सुखरूप घरी परतणाऱ्या एका शीख सैनिकाचा आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त हा हृदयस्पर्शी व्हिडीओ संदीप थापर यांनी ट्विटरवर म्हणजेच नवीन X सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे, ज्यामध्ये एक तरुण शीख सैनिक जेव्हा आपल्या घरी परततो तेव्हा त्याचे कुटुंबीय कशाप्रकारे त्याचे जंगी स्वागत करतात, हे दाखवलयं.

(हे ही वाचा : धावला, पडला तरीही नाही सोडला! चित्त्यासारखी झेप घेऊन ‘या’ खेळाडूनं पकडला झेल, व्हिडीओ पाहून तोंडात बोटं घालाल )

पाहा व्हिडीओ

भारतीय लष्करातील जवानाचा मायदेशी परतण्याचा हा स्वागताचा हृदयस्पर्शी व्हिडीओ लोकांना फार आवडला आहे. या व्हिडिओमध्ये शीख कुटुंबाने आपल्या मुलाच्या स्वागतासाठी घराबाहेर रेड कार्पेट तयार केल्याचे दिसत आहे. शिख कुटुंबातील हा मुलगा प्रशिक्षण पूर्ण करून पहिल्यांदाच घरी परतला आहे. तरुण सैनिकाचे प्रथम कुटुंबाने जोरदार स्वागत केले, त्यानंतर शीख सैनिक प्रथम जमिनीवर लोटांगण घालून आपल्या आईचे आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतात. यानंतर तो भाऊ आणि बहिणीला मिठी मारतो.

हा व्हिडिओ आतापर्यंत ८०.५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचबरोबर देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय लष्कराच्या जवानांना अनेक जण प्रतिक्रिया देत सलाम करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video goes viral on independence day sikh soldier returns home to grand welcome by family pdb