Gwalior PWD Employee Molests Girl Video Viral : नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणींची फसवणूक झाल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये तरुणींना अत्याचार किंवा गैरवर्तवणुकीचा सामना करावा लागतो. अशीच काहीशी घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये घडली. या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हीही तीव्र संताप व्यक्त कराल.

त्याचे झाले असे की, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील पीडब्ल्यूडीमधील उपअभियंता रामस्वरुप कुशवाहा याने एका तरुणीला नोकरी देण्याचे प्रलोभन देत एका रेस्ट हाऊसमध्ये बोलावले. तरुणी त्याच्या सांगण्याप्रमाणे डबरा रेस्ट हाऊसवर पोहोचली, पण तिथे पोहोचताच उपअभियंत्याने तिच्याबरोबर गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे तरुणी संतापली आणि तिने उपअभियंत्याला रेस्ट हाऊस रुममध्येच चपलेने तुडवण्यास सुरुवात केली.

Ankita Walawalkar First Kelvan
Video : “वालावलकरांची पोरगी पटवली…”, अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याने घेतला हटके उखाणा, ‘असं’ पार पडलं पहिलं केळवण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Female officer of provident fund office assaulted Shivajinagar police files case against businessman
भविष्य निर्वाह कार्यालयातील महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की, शिवाजीनगर पोलिसांकडून व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Viral Girl Shravanis New Video
मित्रांची साथ सोडून देण्याचा चिमुकलीने दिला सल्ला; पण ‘ती’ असं का म्हणाली? Viral Video तून बघा
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
Mother love Viral Video
‘शेवटी त्यालाही कळली आईची माया…’ मुलाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या आईची ट्रेन गार्डने केली मदत; हृदयस्पर्शी VIDEO पाहून व्हाल भावूक
friend request, Facebook , Complainant woman,
तक्रारदार महिलेला फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट? उच्च न्यायालयाचे तपास अधिकाऱ्यांच्या कृतीवर ताशेरे
Suresh Dhas and ajit pawar
Suresh Dhas : “अजितदादा, क्या हुआ तेरा वादा…”, सुरेश धसांनी परभणीची सभा गाजवली; ‘बिनमंत्र्यांचा जिल्हा’ ठेवण्याची मागणी!

तरुणीने उपअभियंत्याला रेस्ट हाऊस रुममध्येच चपलेने तुडवण्यास केली सुरुवात

या घटनेच्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, संतापलेल्या तरुणीने तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केलेस असे म्हणत उपअभियंत्याला मारहाण केली. शिवीगाळ करत त्याचे चपलेने थोबाड फोडले. असे सांगितले जाते की, तरुणी आपल्या मित्राबरोबर पीडब्ल्यूडीमधील उपअभियंत्याकडे नोकरीची विचारणा करण्यासाठी गेली होती, यावेळी त्या उपअभियंत्याने तिला मुलाखतीसाठी एका रेस्ट रुममध्ये बोलावले. उपअभियंत्याने दिलेल्या पत्त्यानुसार तरुणी रेस्ट रुममध्ये पोहोचली, पण तिथे मुलाखतीच्या नावाखाली तो तरुणीबरोबर गैरवर्तन करू लागला.

तरुणीने त्यास विरोध करताच तो तिच्यावर जबरदस्ती करण्याचाही प्रयत्न करू लागला, यामुळे तरुणी चांगलीच संतापली आणि थेट पायातील चप्पल काढून तिने त्याच्या थोबाडात मारण्यास सुरुवात केली. यावेळी तिच्याबरोबर आलेल्या तिच्या मित्राने घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. यावेळी उपअभियंता अपमानित होत काहीही न बोलता घटनास्थळावरून पळून गेला.

@navalkant नावाच्या एक्स युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, नेता विनाकारण बदनाम आहे. उपअभियंत्याच्या कृतीकडे लक्ष द्या. ग्वाल्हेरमध्ये पीडब्ल्यूडीचे उपअभियंता रामस्वरूप कुशवाह यांनी एका तरुणीला नोकरीच्या बहाण्याने डाबरा रेस्ट हाऊसमध्ये बोलावून तिच्याबरोबर गैरकृत्य केले. यावेळी संतापलेल्या तरुणीने उपअभियंत्याला चप्पलने मारहाण केली.

या व्हिडीओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी या घटनेतील तरुणीच्या धाडसाचे कौतुकही केले आहे.

Story img Loader