प्रत्येकाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. केवळ यशस्वी न होता हातात चांगला पैसाही हवा असतो. आजच्या काळात प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे असते. प्रत्येकाला आयुष्यात खूप पैसा कमवायचा असतो आणि पैसा कमवण्यासाठी लोकांना खूप मेहनत करावी लागते. स्त्री असो वा पुरुष, प्रत्येकाला आपल्या आयुष्यात श्रीमंत व्हायचे होण्याची इच्छा आहे. प्रत्येकाला इतका पैसा हवा असतो की तो सर्व समस्या सोडवू शकेल आणि आपले जीवन आरामात जगू शकेल. यासाठी काही लोक कठोर परिश्रमावर विश्वास ठेवतात तर काही लोक शॉर्टकट पद्धतीचा अवलंब करू इच्छितात. शॉर्टकटचा अवलंब करून लवकरात लवकर श्रीमंत होऊ इच्छिणारे अनेक लोकं तुम्हाला सापडतील. आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ अशाच लोकांसाठी आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे, जाणून घेऊया…

श्रीमंत होण्याचा सांगितला अनोखा मार्ग

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका हरियाणामधील व्यक्तीने लोकांना श्रीमंत होण्याचा अनोखा मार्ग सांगितला आहे. त्यांनी लोकांना झटपट श्रीमंत होण्याची एक भन्नाट आयडिया सुचविली आहे आणि त्यांचा हाच व्हिडिओ आता सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हरयाणातील काका सांगतात, “तुम्ही बाजारात जा आणि सर्वात महागड्या कारजवळ उभे राहा. यानंतर तुम्ही बाजारात एखाद्या उच्च मध्यमवर्गीय व्यक्तीचा शोध घ्या, ज्याच्याकडे पैसा असेल आणि तुम्ही त्याला सांगा, “माझी चावी आणि माझा फोन चुकून कारच्या आत राहिलं आहे. कृपया तुम्ही मला १०० रुपये देऊ शकता का..?”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

दिवसभरात तुम्हाला दहा ते वीस असे लोकं नक्की भेटतील जे तुमची संपत्ती पाहून आणि स्टेटस पाहून तुम्हाला १०० रुपये देऊन तुमच्या मदतीस धावतील. यामुळे तुमच्या महिन्याची कमाई चांगली होईल. या पर्यायाने तुमचे महिन्याचे ४० हजार रुपये कुठेच गेले नाही म्हणून समजून घ्या. पण यासाठी तुम्ही फक्त तुमच्या दिसण्याकडे लक्ष द्या आणि चांगले कपडे घाला. ही आयडिया तुम्ही केली तर तुम्हाला लवकर श्रीमंत होण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही. ही भन्नाट आयडिया तुम्ही तुमच्या बेरोजगार मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून एखाद्याचे आयुष्य सुधारेल. मजेशीर पद्धतीने बनवलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

(हे ही वाचा : Dancing Dadi: “जमाल कुडू…”, आजीही स्वतःला आवरू शकली नाही; डोक्यावर चहाचा कप अन् शेवटची स्टेप तर…पाहा VIRAL VIDEO )

व्हायरल व्हिडिओ येथे पहा

हा व्हिडिओ @HasnaZaruriHai नावाच्या पेजद्वारे मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर करण्यात आला आहे. अनेक लोकांनी हा मजेशीर व्हिडिओ पाहून भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader