Viral Video Gram Panchayat:राज्यातील विविध जिल्ह्यांमधील एकूण ७ हजार ७५१ ग्रामपंचायतीतील सदस्यांसह थेट सरपंच पदासाठीही रविवारी मतदान पार पडलं. मंगळवार २० डिसेंबरला या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल समोर आले. निकालानंतर साहजिकच अनेक ठिकाणी जल्लोष व गुलालाची उधळण पाहायला मिळाली. मात्र या सगळ्यात एका ७० वर्षीय आजीबाईंच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. परभणीच्या (Parbhani ) पूर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथे महाविकास आघाडीने ९ पैकी ७ जागा जिंकून आपली सत्ता प्रस्थापित केली होती. यापैकी एका जागेवर या आजीबाईंच्या सूपूर्तने विजयी पताका रोवली होती. याचाच आनंद व्यक्त करताना आजीबाईंनी अशा भन्नाट डान्स केला की ज्याची चर्चा अद्यापही सुरु आहे.
चेतन बोडके या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या या व्हायरल व्हिडिओमध्ये आपण या आजीबाईंनी तुफान ऊर्जा पाहू शकता. प्राप्त माहितीनुसार त्यांचे नाव रुक्मिणीबाई ढोणे असे आहे. त्यांच्या पॅनलमध्ये ९ पैकी ७ जागांवर विजय मिळालेल्याने गळ्यात हार घालून ढोल ताशाच्या तालावर त्याजोरदार डान्स करत आहेत.
ग्रामपंचायत निकाल पाहून आजीबाईंना अत्यानंद
हे ही वाचा<< नितीन गडकरी यांनी ताज हॉटेलमध्ये शेफला पगार विचारला; म्हणतात, “रोज संध्याकाळी ७ नंतर मी..”
दरम्यान, थेट सरपंच निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार पार पडलेल्या निवडणुकींचा निकाल समोर येताच महाविकासआघाडी व भाजपा आणि शिंदे गट या दोन्ही बाजूंकडून आपणच सर्वाधिक जागांवर विजयी झाल्याचे दावे करण्यात येत आहेत. महाविकास आघाडीला ग्रामपंचायत निवडणुकीत ३२५८ सरपंच पदे तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळाल्याची माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. तर, भाजपाच्या दाव्यानुसार, भाजप आणि शिंदे गटाने मिळून ३,२०० पेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत.