Groom Kissed Bride, Family Beats Groom Family Video: आयुष्यातील सर्वात मोठा व खास दिवस म्हणजे लग्नाचा, असा साधारण ९० टक्के लोकांचा समज असतो. म्हणूनच हा आपला एकमेव अद्वितीय दिवस खास करण्यासाठी वाटेल ती गोष्ट करायला लोक तयार असतात. मग ते आकाशातून क्रेन लावून एंट्री घेणं असो, चिखलात लोळून फोटोशूट करणं असो, किंवा नजर काढण्याच्या निमित्ताने ‘दौलत जादा’ केल्याप्रमाणे पैसे उडवणे असो. एक बेस्ट रील यावा आणि त्याला मिलियन व्ह्यूज यावे यासाठी लग्नाच्या प्लॅनिंगमध्ये एखादा तरी हटके प्रकार हल्ली केलाच जातो. असाच हटकेपणा करण्याचा हट्ट आता एका नवरदेवाच्या अंगाशी आल्याचं समजतंय. उत्तर प्रदेशातील हापूर येथील एका जोडप्याने कुटुंबियांसमोर असे काहीतरी करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे त्यांचे लग्न जवळपास रद्द झाले इतकंच नव्हे तर नवऱ्याच्या कुटुंबाला चोप सुद्धा देण्यात आला. असं नेमकं घडलं तरी काय, चला पाहूया..
वरमाला घालण्याच्या विधिदरम्यान अलीकडे अनेक जोडपी एकमेकांना आधी किस करतात आणि मग गळ्यात हार घालतात. विशेषतः शहरांमध्ये आणि त्यातही प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी तर ही खूप क्षुल्लक बाब आहे पण हा ट्रेंड उत्तर प्रदेशातल्या हापूर गावी जेव्हा घडला तेव्हा नवरदेवासह त्याच्या कुटुंबाला सुद्धा नवरीकडच्या मंडळींना अक्षरशः रात्रीचा सूर्य दाखवला. झालं असं की, वधूच्या गळ्यात हार घालताना वराने तिचे चुंबन घेतले यामुळे नवरीचे कुटुंब इतके भडकले की त्यांनी चक्क नवऱ्यालाच मारहाण केली. इतकंच नाही तर काही वऱ्हाडी मंडळींनी तर थेट स्टेजवर येऊन लाठी- काठीने नवरदेवाला बदडायला सुरुवात केली.
दुसरीकडे, वराने मात्र असा दावा केला की वधूलाचा समारंभात चुंबन घ्यायचे होते.हापूरचे एएसपी राजकुमार अग्रवाल यांनी टाईम्स ऑफ इंडिया (TOI) ला सांगितलेल्या माहितीनुसार “मध्यरात्री दीड वाजता, आम्हाला कॉल आला जवळपास डझनभर लोकांना ताब्यात घेण्यात आले आणि CrPC 151 (अज्ञात गुन्ह्यांसाठी अटक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पाच जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु नंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोणतीही औपचारिक तक्रार दाखल करण्यात आली नाही.”
हे ही वाचा<< तेजस्वी यादव यांनी मद्यधूंद स्थितीत मोदींवर ताशेरे ओढले? लोकांनी Video शेअर करताना केला मोठा बदल, खरा मुद्दा पाहा
अग्रवाल असेही म्हणाले की, “हापूरच्या अशोक नगर भागात दोन बहिणींचा विवाह सोहळा सुरू होता. मोठ्या बहिणीचे लग्न कोणत्याही प्रसंगाविना पार पडले, तेव्हा धाकट्या बहिणीच्या वराने स्टेजवर तिचे चुंबन घेतल्याने वाद सुरू झाला या घटनेनंतर कुटुंबीयांनी लग्न रद्द करण्याचा विचार केला. मात्र, या जोडप्याने लग्नासाठी आग्रह धरला. वडिलांनी हस्तक्षेप केल्यावर लग्नासाठी पुढील तारीख ठरवून तात्पुरता विषय मिटवण्यात आला.” पोलिसांनी या घटनेत सहभागी सहा जणांवर सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे