Viral Video Man Marries Dead Girlfriend: दिल्लीमध्ये झालेल्या श्रद्धा हत्याकांडानंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकर या तरुणीचा तिचाच बॉयफ्रेंड (आफताब पूनावाला) याने अत्यंत निर्घृण पद्धतीने खून केला होता. केवळ जीव घेऊनच हा आफताब थांबला नाही तर उलट त्याने पुढे श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करून ते एक एक करून जंगलात फेकले, तब्बल सहा महिने तो श्रद्धा जिवंत असल्याचे भासवत त्याच घरात राहात होता. या एकूण प्रकरणानंतर प्रेमावर विश्वास ठेवावा का हा प्रश्नच पडू लागला आहे. पण या सगळ्या विकृत घटनेनंतर आसाम मधील एक व्हायरल होणारा व्हिडीओ सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रेम करावं तर असंच.. हे म्हणायला हा व्हिडीओ नेमका आहे काय चला पाहुयात..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हायरल होणारा व्हिडीओ हा आसामच्या गुवाहाटी येथील खाजगी रुग्णलयातील असल्याचे समजतेय. या रुग्णालयात काही दिवसांपूर्वी एका तरुणीची दुर्धर आजाराने मृत्यू झाला. यावेळी तिच्या बॉयफ्रेंडने केलेली एक कृती अक्षरशः डोळ्यात पाणी आणणारी आहे. लग्न करेन तर हिच्याशीच अशी शपथ एक प्रेमवीर घेतात पण दिलेला शब्द पूर्ण करणारे खूप कमी जण असतात त्यातीलच हा २७ वर्षीय बिटुपन तामुली असावा. त्याने आपल्या मृत्य गर्लफ्रेंडच्या कपाळावर कुंकू लावून तिच्याशी लग्न केलं आहे. इतकंच नव्हे तर यापुढे मी कुणाशीही लग्न करणार नाही अशी शपथ त्याने घेतली आहे.

हे ही वाचा<< Video: जंगलाचा राजा झाला भावुक; ७ वर्षांनी मालकीण दिसताच भल्यामोठ्या दोन सिंहांनी उडी घेतली अन..

दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्रेम करण्यासाठी नाही तर प्रेम निभावण्यासाठी हिमंत लागते असे म्हणत अनेकांनी या तरुणाला शाबासकी दिली आहे तर काहींनी त्याला सल्ला देत, जाणारा माणूस जातो पण त्यात अडकून राहू नये व तुझे आयुष्य तू एकटेपणात काढू नकोस असेही म्हंटले आहे. यापुढे हा तरुण जो काही निर्णय घेईल तो सर्वस्वी त्याचा असेल पण या एका व्हिडीओमुळे त्याने प्रेमावर हरवत चालला विश्वास पुन्हा मिळवून द्यायला मदत केली आहे असे म्हंटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video guwahati man marries dead body of girlfriend people shocked after delhi shraddha murder case says this is love svs