Viral video: तुमच्या घरात जर लहान मूल असेल, तर ही बातमी तुम्ही आवर्जून वाचली पाहिजे. लोणावळ्यात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेल्याची घटना रविवारी (३० जून) घडली होती. ही घटना ताजी असतानाच ताम्हिणी घाटात एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली. दरम्यान, अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. त्यामध्ये एक लहान मुलगा नदीच्या प्रवाहात वाहून जाताना थोडक्यात बचावला आहे. या घटनेचा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिल्यावर थरकाप उडत आहे. हा मुलगा वाहून जाताना तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी अवघ्या काही सेकंदांत घेतलेल्या निर्णयामुळे हा चिमुकला बचावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही सेकंदात घेतलेल्या निर्णयामुळे धोका टळला

लहान मुलं असतील तर आपल्याला सतत सावध राहावं लागतं. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ही मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. दरम्यान, अनेक कुटुंबं आपल्या लहान मुलांसह धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येथे आली होती. व्हिडीओच्या सुरुवातीला अनेक नागरिक येथे मजामस्ती करताना दिसत आहेत. मात्र, काही वेळानंतर येथील चित्रच पालटलं. अचानक पाण्याचा वेग आणि पातळी वाढल्यानंतर पर्यटकांमध्ये घबराट निर्माण झाली. धबधब्यातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचा वाढता वेग पाहून नागरिकांना बाजूला होण्यास सांगण्यात आलं. वेळेत पर्यटक बाजूला झाल्यामुळे पुढील संभाव्य जीवितहानी टळली. परंतु, एक लहान मुलगा एकटाच तिथे अडकला होता.

वाचा नेमकं काय घडलं ?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा लहान मुलगा पाण्याच्या मधोमध उभा आहे. परंतु, पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढल्याने तो खाली पडतो आणि पाण्याबरोबर वाहू लागतो. त्यामधूनही तो स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करीत आहे; मात्र जलप्रवाहाच्या वेगापुढे त्याला स्वत:ला सावरणं कठीण जातंय. दरम्यान, यावेळी तेथे पाण्याबाहेर असलेला एक जण धाडस करीत कशाचाही विचार न करता, चिमुकल्याला वाचविण्यासाठी पुढे गेला. स्वत:चा जीव धोक्यात घालत, तो पुढे गेला आणि चिमुकल्याला सुखरूप बाहेर घेऊन गेला. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या व्यक्तीच्या निर्णयाचं कौतुक कराल.

पाहा व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/C8RSjy3SgUy/?igsh=MmJkbjV1NXFkMDA2

हेही वाचा >> धबधब्यात भिजायला जाताय? थांबा! तरुणासोबत काय घडलं पाहा; VIDEO पाहून थरकाप उडेल

हा व्हिडीओ mallustory1.0 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचाही थरकाप उडाला आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, “अशा ठिकाणी लहान मुलांना घेऊन जाऊच नये.” तर दुसऱ्या एका युजरनं म्हटलंय की, त्या व्यक्तीच्या धाडसाला सलाम!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral srk
First published on: 03-07-2024 at 13:09 IST