Viral Video: विमानात बसायचं म्हणजे आपल्या पण मनात एक भीती असते. विज्ञान तंत्रज्ञान कितीही प्रगत झाले असले तरी अचानक विमान हवेतून खाली कोसळले तर? टेक ऑफच्या वेळेला धावपट्टीवरून घसरलं तर.. सगळंच जाऊदे पण पूर्ण प्रवास संपवून आयत्या वेळी लँडिंग नीट झालं नाही तर.. असे एक ना अनेक प्रश्न आपल्यालाही पडले असतील. एरवी तुमचे हे प्रश्न कसे केवळ तुमच्या मनाचे खेळ आहेत असे समजवून देण्याचा प्रयत्न केला असता पण आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे ही भीती खरीही होऊ शकते असंच म्हणायला लागेल. अलीकडेच सोशल मीडियावर एका हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात वैमानिकाचे नियंत्रण सुटल्याने अत्यंत विचित्र पद्धतीने अपघात घडला आहे.
ट्विटरवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की खाजगी छोट्या हेलिपॅडवर उभे असलेले हेलिकॉप्टर जसे टेक ऑफसाठी सज्ज असते. हेलिकॉप्टर जमिनीपासून किंचित वर उडताच पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटते. एखाद्या पार्टी करून आलेल्या मद्यधुंद माणसाप्रमाणे हे हेलिकॉप्टर हवेतच डोलू लागले आहे. आणि शेवटी ते इतक्या धक्कादायक पद्धतीने कोसळते की जे बघून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे.
हा व्हिडिओ लान्स नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने विनोदी कॅप्शनसह शेअर केला होता, ज्यामध्ये लिहिले होते, “विमा कंपनीला व्हिडिओशिवाय हे समजावून सांगणं अशक्यच झाले असते.”
हेलिकॉप्टर उडायला गेलं आणि..
हे ही वाचा << Video: राग अनावर झाला अन् जे घडलं.. विमानात दोन प्रवाशांची हाणामारी; हवाई सुंदरी मध्ये येताच..
व्हायरल व्हिडिओमध्ये एका लहान हेलिपॅडमध्ये हेलिकॉप्टर पार्क केलेले दिसत आहे आणि त्याच्याजवळ दोन अन्य कार देखील उभ्या असल्याचे दिसत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर हे समजू शकते की, पायलटला हेलिकॉप्टरचे इंजिन सुरू केल्यानंतर लगेच नियंत्रित करता येत नाही. नियंत्रण सुटल्याने हेलिकॉप्टर थरथरू लागते आणि त्याचे तुकडे होऊन ते उलटे पडते. व्हिडिओमध्ये एक घाबरलेला कुत्रा आणि पायलटला काही सूचना देण्याचा प्रयत्न करणारा एक माणूस देखील दिसत आहे.