Home Made Phenyl Viral Video: अलीकडे लग्नाचा सीझन सुरु आहे. अशावेळी घराची स्वच्छता बारकाईने केली जाते. घरात पाली, झुरळे आणि अनेक आजारांना कारणीभूत असणारे मच्छर शिरू नयेत यासाठी आपणही खूप प्रयत्न करत असाल पण कधीतरी कुठली खिडकी उघडी राहते आणि हे न बोलावलेलं पाहुणे घरात शिरतात. घरात एकदा का पालीचा शिरकाव झाला की मग अथक प्रयत्न करूनही पाल हाकलणे शक्य होत नाही उलट काही दिवसांनी पालीची पिल्लं येऊन आपली संख्या वाढवत जातात. अशावेळी कीटकनाशके, केमिकल युक्त स्प्रे सुद्धा काहीच फायद्याचे ठरत नाहीत.
आज आपण इंस्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या हॅकची माहिती घेणार आहोत. यात घरच्या घरी फिनेल कसे बनवावे याविषयी सांगण्यात आले आहे. या फिनेलने लादी व किचनचा ओटा पुसल्यावर घरात फ्रेश सुगंध पसरतोच पण पाली व झुरळ सुद्धा घरातून धूम ठोकतात असे सांगण्यात येत आहे. ही हॅक आपण अगदी काही मिनिटात करू शकता. आता आपण हे ट्राय करणार असाल तर सुरुवातीला कमी प्रमाणात करून पाहा. यासाठी नेमकं काय सामान लागेल पाहुयात..
घरगुती फिनेलसाठी लागणारं सामान
घरात फिनेल बनवण्यासाठी आपल्याला लिंबाची सालं, डिटर्जंट पावडर (कोणतीही), मीठ, बेकिंग सोडा व डेटॉल किंवा कोणतेही सुगंधी द्रव्य, व्हिनेगर हे एवढंच सामान लागणार आहे.
घरगुती फिनेल कसे बनवाल?
दरम्यान ही संपूर्ण प्रक्रिया जर तुम्ही करणार असाल तर ग्लोव्ह्ज घालायला विसरू नका. लहान मुलांपासून हे लिक्विड लांब ठेवा. ही व्हायरल हॅक @GobletHoney या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आली होती. या व्हिडिओला आतापर्यंत १ लाख २५ हजार लाईक्स मिळाले आहेत.