Viral Video: बाबा वेंगा, नॉस्ट्रॅडम्स सारख्या प्राचीन अभ्यासकांनी २०२३ बाबत अनेक भविष्यवाण्या केल्या होत्या. पृथ्वीवर नैसर्गिक आपत्ती येण्याबाबत या दोघांनीही नमूद केले होते. हजारो वर्षांपूर्वी झालेल्या भविष्यवाण्या खऱ्या होतील का हा प्रश्न असताना आता त्याची चाहूल देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर दिसणाऱ्या व्हिडिओमध्ये जमिनीत एक खड्डा झाला असून हा खड्डा पूर्ण शेत आपल्या जबड्यात सामावून घेत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येत असल्याचे अनेकांनी कमेंट केले आहे आणि बहुधा जेव्हा तुम्ही हा व्हिडीओ पाहाल तेव्हा तुमची प्रतिक्रियाही काहीशी अशीच असू शकते.
प्राप्त माहितीनुसार केनियाच्या पश्चिम घाटात हायलँड्स येथे केरीचो नावाचा हा सिंकहोल तयार झाला आहे. ही स्थिती संपूर्णतः प्राकृतिक आहे. पूर्व आफ्रिकन ग्रेट रिफ्ट व्हॅलीचा हा भाग असून येथील जमीन दोन वेगळ्या घाटांचा भाग आहे जे विभागल्याने सिंकहोल तयार झाल्याचे भासत आहे.
अवघ्या ३७ सेकंदाची ही क्लिप @weirdterrifying या अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. हा केनियामधील व्हिडीओ असल्याचे कॅप्शनमध्ये म्हंटले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ९० लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले असून १४ हजार जणांनी याला रिट्विट केले आहे. तसेच या व्हिडिओला ८८ हजार लाईक्स आहेत.
Video: जमिनीने गिळली शेतं
हे ही वाचा<< २०२३ मध्ये युती होणार? जगात केवळ श्रीमंती..; Nostradamus ची भविष्यवाणी खरी झाली तर माणूस थेट..
या व्हिडिओवर एका युजरने कमेंट करत म्हंटले की, हे बघून मला स्ट्रेन्जर थिंग्सचा एपिसोड आठवत आहे. जमिनीत झालेला हा सिंकहोल शेत, पिके, व त्यावरील कीटकनाशके सगळं काही गिळून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे नेमका निसर्ग आपल्याला काय संदेश देऊ पाहत आहे हे समजून घ्यायला हवे.