Niagara Falls Turn Into Ice Viral Video: न्यूयॉर्कसह संपूर्ण युनाइटेड स्टेट्स हिमवादळाच्या तडाख्याचा बळी ठरलं आहे. युनायटेड स्टेट्समध्ये अनेक दिवसांपासून होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे अनेक भागात वीज खंडित झाली, प्रवासाचे मार्ग ठप्प झाले आहेत. तर अनेक मृत्यूंचीही नोंद झाली आहे. बफेलोमध्ये, तर अक्षरशः जेथे वाहनांमध्ये आणि बर्फाच्या तळ्याखाली मृतदेह सापडले होते. सोशल मीडियावर या स्थितीचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. मात्र यातील एक व्हिडीओ काहीसा सुखद व थक्क करणारा आहे. सोशल मीडियावर सध्या नायगारा धबधब्याचा बर्फाने गोठलेला व्हिडीओ तुफान ट्रेंड होत आहे. नायगाराचा भव्य धबधबा हा बर्फवृष्टीमुळे गोठला आहे.
आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की नायगाराच्या गोठलेल्या धबधब्यातही काही भागात पाणी वाहत आहे मात्र धुक्यामुळे धबधबा वाहतानाच अचानक थांबल्याचे दिसत आहे. बर्फाच्या चादरीखालून पाणी वाहत असल्याची माहिती नायगारा पार्क वेबसाईटवर देण्यात आली आहे. नायगारा फॉल्स न्यूयॉर्क स्टेट पार्कनुसार, दर सेकंदाला सुमारे ३२ फूट प्रति सेकंद वेगाने ३, १६० टन पाणी नायगारा फॉल्सवरून वाहते.
जेव्हा नायगारा धबधबा पूर्ण गोठतो
हे ही वाचा<< सुट्टीच्या दिवशी कॉल, मेसेज केला तर १ लाख दंड; भारतीय कंपनीचा ‘हा’ नियम तुमच्या ऑफिसमध्ये हवा ना?
दरम्यान, विशेषतः थंड हिवाळ्यात फॉल्सच्या पायथ्याशी नायगारा नदीवर वारंवार बर्फ गोठतो. ज्यामुळे इथे जणूकाही एक “बर्फाचा पूल” बनतो. ४ फेब्रुवारी १९१२ रोजी पोस्टनुसार, बर्फ वितळून नदीत पडल्याने तीन लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर थंडीत अधिकाऱ्यांनी लोकांना बर्फाच्या पुलावरून चालण्यास बंदी लावली आहे. तूर्तास तुम्हाला हे नायगारा धबधब्याचे नेत्रदीपक दृश्य कसे वाटते हे कमेंट करून नक्की कळवा.