Tiger Viral Video: रात्रीच्या वेळेचा प्रवास हा सुखाचा मानलाजातो , याचे मुख्य कारण म्हणजे ट्रॅफिक जाममध्ये अडकून पडण्याची शक्यता तशी कमी असते. वातावरणात थंडावा असल्याने आणि आजूबाजूला फार हॉर्नची कटकट नसल्याने डोकंही तसं शांत राहायला मदत होते. छान गाणी आणि बाजूला चांगली कंपनी असेल तर रात्रीच्या प्रवासाची मजा काही औरच होऊन जाते. पण समजा रात्रीच्या वेळी तुम्ही असाच शांत- निवांत प्रवास करताय आणि अचानक समोर वाघोबा येऊन उभे राहिले तर.. सुखाचा प्रवास आता शेवटचा होतोय की काय असा विचार करूनच धडकी भरते ना? पण अलीकडेच असा प्रकार काही प्रवाशांसह प्रत्यक्ष घडला आहे. सोशल मीडियावर वाघ व प्रवाशांच्या अनपेक्षित व घाबरवून टाकणाऱ्या भेटीचा व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एका गाडीचा ड्रायव्हर अंधाऱ्या रस्त्यावर थांबला आहे. गाडीच्या आतूनच तो रस्त्यालगतच्या गवताच्या दिशेने हेडलाईट्स वळवतो. यावेळी समोर चक्क एक वाघोबा कधीही हल्ला करतील असा नेम रोखून बसलेले दिसून येत आहेत. उत्तराखंड फोटोग्राफी क्लब या पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्याने हा देवभूमी उत्तराखंडातीलच व्हिडीओ असल्याचा अंदाज आहे. रोहित भाटिया या युजरने हा व्हिडीओ शूट केला होता.

नेम रोखून बसला वाघ, गाडी समोर येताच..

हे ही वाचा<< कलियुग रे बाबा! सिंहाच्या पाठीवर बसून निघालं माकड; जंगलाच्या राजाने एका क्षणात दिला आयुष्याचा धडा

दरम्यान, यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत. जंगल भागातील प्राणी रस्त्यालगतच्या गवतांमध्ये विश्रांतीसाठी बसलेले असतात असे नेटकऱ्यांचे अंदाज आहेत. व्हिडिओवर काही युजर्सनी कमेंट करून तुम्ही जीव वाचवून पळायच्या ऐवजी व्हिडीओ काय काढत बसलात असेही म्हंटले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video huge tiger spotted aiming tourist car viral clip will make you terrified watch here animal attacks svs