मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात सोमवारी धक्कादायक प्रकार घडला. शहरातील राणीगंज मोहल्ल्याला लागून असलेल्या खेरमाई मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या पती-पत्नीवर अस्वलाने हल्ला केला. अस्वलाने त्यांना खाल्ल्याचे बोलले जात आहे. सुमारे २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर या नरभक्षक अस्वलाला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाच्या पथकाला यश आले.
मिळालेल्या माहितीनुसार, वनविभागाच्या बचाव पथकाने अस्वलाला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन पिंजऱ्यात बंद केले. या दाम्पत्याची शिकार केल्यानंतर अस्वल सुमारे ५ तास त्यांच्या मृतदेहाशी खेळत होता त्या मृतदेहाचे काही अवयव त्याने खाल्ले होते. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले असून, कोणता मृतदेह स्त्रीचा आणि कोणता पुरुषाचा हे देखील कळू शकत नाही. त्याचवेळी वनविभागाने मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये आणि नोकरी देण्याची घोषणा केली आहे.
(हे ही वाचा: स्विगी डिलीव्हरी बॉयला पोलीस हवालदाराकडून मारहाण; Video Viral झाला अन्…)
स्थानिक लोकांनी अस्वलाला हुसकावून लावण्याचा खूप प्रयत्न केला पण तो पळून गेला नाही. तत्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली. अस्वलाचे उग्र रूप पाहून कोणीही त्याच्या जवळ जाण्याचे धाडस करू शकले नाही. सुमारे पाच तास तो मृतदेह खात राहिला. त्याने जोडप्याचे अर्ध्याहून अधिक शरीर खाल्ले.
(हे ही वाचा: Shocking Video: थोडक्यात बचावला ‘या’ व्यक्तीचा जीव, अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ viral)
(हे ही वाचा: तुमच्या ड्रीम जॉब शोधण्यासाठी मदत करेल हे Optical Illusion; ‘ही’ टेस्ट घ्या आणि उत्तर मिळवा)
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांसह पोलीस व वनविभागाच्या काही कर्मचाऱ्यांनी या अस्वलाला मृतदेहापासून दूर हाकलण्याचा प्रयत्न केला, मात्र अस्वल मृतदेहावरून बाजूला झाले नाही. नंतर पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्या पथकाने येऊन या अस्वलाला बेशुद्धावस्थेत पकडले मात्र तोपर्यंत त्याने दाम्पत्याच्या शरीराचा भाग अर्ध्याहून अधिक खाल्ला होता. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली. वनविभागाचे पथक घटनास्थळी उशिरा आले, असा आरोप त्यांनी केला आहे.