Heartbreaking Video : बुधवारी रात्री गुजरातमधील जामनगरजवळ भारतीय हवाई दलाचे एक जॅग्वार लढाऊ विमान कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान भारतीय हवाई दलाचे तरुण वैमानिक फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वैमानिक सिद्धार्थ यादव यांनी अगदी शेवटच्या क्षणी योग्य निर्णय घेऊन अनेकांचे प्राण वाचवले पण त्यांना वीरगती प्राप्त झाली.
सिद्धार्थ यादव यांच्या पार्थिवावर शुक्रवारी हरियाणातील रेवाडी जिल्ह्यातील त्यांचे मूळ गाव माजरा भालखी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहीद सिद्धार्थ यादव यांना भारतीय वायुसेनेच्या जवानांनी सलामी दिली. यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. शहीद सिद्धार्थ जाधव यांची भावी पत्नी सानियाने पार्थिव शरीर पाहून हंबरडा फोडला. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर नेटकरी भावुक होताना दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की शहीद सिद्धार्थ यादव यांचे पार्थिव शरीर तिरंग्यात लपेटून एका कॉफिनमध्ये ठेवलेले दिसत आहे. सानिया त्या कॉफिनला जवळ येऊन रडत आहे. ती वारंवार एकच वाक्य बोलत होती की “तू मला घ्यायला येणार होतास ना, मग का नाही आलास?” तिथे उपस्थित असलेले कुटुंबातील लोक तिला सावरण्याचा प्रयत्न करत होते. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावुक होईल. काही लोकांना अश्रु आवरणार नाही.
व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
vipul_tiwaari या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्स व्हिडीओ पाहून भावुक झाले आहेत. एका युजरने लिहिलेय, “तिच्या डोळ्यातील दु:ख मी समजू शकतो” तर एका युजरने लिहिलेय, “आपल्या अत्यंत प्रिय व जवळच्या माणसाला गमावल्याचं दु:ख” आणखी एका युजरने लिहिलेय, “सैनिकाची पत्नी किंवा प्रेयसी होणे खूप कठीण आहे” एक युजर लिहितो, “अन् माझ्या देशातील लोक धर्मासाठी लढतात.. ” एक युजर लिहितो, “देव तिला शक्ती देवो” तर एक युजर लिहितो, “जवान देशासाठी प्राण देतात आणि आपण फक्त जाती धर्मांवरून भांडतो.. खरंच वाईट वाटतं” अनेक युजर्सनी या जवानाला श्रद्धांजली वाहिली आहे. काही युजर्सनी त्याच्या होणाऱ्या पत्नी व कुटुंबाविषयी सहानुभूती व्यक्ती केली आहे.