Shocking video: सोशल मीडियावर दररोज नवीन काहीतरी पाहायला मिळते. यातील काही व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात. तर, काही व्हिडिओ आश्चर्यचकीत करणारी असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात. कितीही चलाख चोर असुदेत पोलीस चोराला शोधून काढतातच. तरीही चोऱ्यांचे प्रमाण काही कमी होत नाही. चोरांचे एक वैशिष्ट्य म्हणजे चोरी करण्यापूर्वी त्यांना कोणाचीही दया येत नाही, चोरी एक हजार रुपयांची असो वा एक कोटी रुपयांची, संधी मिळताच ते हात साफ करतात.
रात्रीच्यावेळी बंद घरांमध्ये, दुकानात चोरी केल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील. या संदर्भातील अनेक व्हिडीओही व्हायरल झालेले समोर आलेले आहेत. मात्र सध्या समोर आलेल्या प्रकरणामध्ये एक चोर दुकानात चोरी करण्यासाठी गेला खरं पण त्याच्यासोबत काय घडलं ते तुम्हीच पाहा.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चोर चोरी करण्यासाठी दुकान फोडून आतमध्ये जातोय. यावेळी त्याचा पाय चुकून एका टेबलला लागतो आणि भींतीवर असलेली देवाची मूर्ती त्याच्या पायावर पडते. हे पाहून चोरही थोडा गोंधळलेला दिसत आहे. मात्र पुढच्याच क्षणी तो असं काही करतो की आपल्यालाही विचार करायला भाग पडते. आता तुम्ही म्हणाल त्यानं असं केलं तरी काय? तर या चोरानं देवाची मूर्ती खाली पडली म्हणून उचलली आणि डोचं ठेवून त्याच्या पाया पडला. एकीकडे चुकीचं काम तर दुसरीकडे देवाच्या पाया पडणाऱ्याला या चोराला पाहून सगळेच विचारात पडले आहेत.असं म्हणतात की कोणतेही काम करण्यापूर्वी देवाचा आशीर्वाद घ्यावा. पण कधी तुम्ही कुठल्या चोराला देवाचा आशीर्वाद घेऊन चोरी करताना पाहिलंय का? नसेल बघितलं तर हा व्हिडीओ नक्की पाहा.पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की हा चोर संस्कारी आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. एकाने म्हंटलं आहे की, “बापरे काय चोर आहे” दुसरा म्हणतो “चोरांना वाटले असावे की सीसीटीव्ही नसतील.” आणखी एका युजरने “चोर असला तरी तो माणूस आहे आणि शेवटी “तूच कर्ता करविता” आहे”