मुसळधार पावसाने केरळसह देशातील अनेक प्रदेशांना चांगलेच झोडपले आहे. दरम्यान रस्ते जलमय झाल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. एकीकडे साचलेल्या पाण्यातून लोक मोठ्या कष्टाने मार्ग काढताना दिसत आहे तर दुसरीकडे उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये साचलेल्या पाण्यातून येणाऱ्या-जाणाऱ्यांना काही तरुण त्रास देताना दिसत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे भरदिवसा पूरग्रस्त रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीवर बसलेल्या एका महिलेची छेड काढणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भरदिवसा महिलेची काढली छेड

व्हायरल व्हिडीओमध्ये लखनऊमध्ये ताज हॉटेलच्या पुलाखालील रस्त्यावर पाणी साचलेले दिसत आहे. दरम्यान साचलेल्या पाण्यातून एक पुरुष आणि महिला दुचाकीवरून जात आहे. दरम्यान तेथे उपस्थित असलेल्या तरुणांच्या एका गटाने या दुचाकीला घेरले. पुराच्या पाण्यातून मार्ग काढत असलेल्या महिला व पुरुषांच्या अंगावर पाणी उडवण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर काही तरुणांनी बाईक ओढण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे बाईक पडली आणि दुचाकीवरील पुरष आणि महिला देखील पाण्यात पडले. व्हिडिओमध्ये बाईक खेचण्यापूर्वी एक पुरुष कथितपणे महिलेला हाताशी धरताना दिसत आहे. ती महिला दुचाकीवरून खाली पडली तेव्हा तिला उठण्यासाठी मदतीची गरज होती.

हेही वाचा – कोयत्याने वार करून व्यक्तीची निघृण हत्या, Video मुंबईतील असल्याचा दावा खोटा, मुंबई पोलिसांनी केले अफवांचे खंडन

भरदिवसा जमावाने काढली महिलेची छेड

महिलेची छेड काढणाऱ्यांवर नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. भरदिवसा महिलेची छेड काढली जात आहे हे पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. इंस्टाग्रामवर @gharkekalesh नावाच्या पेज वर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओवर कमेंट करून अनेकांनी रोष व्यक्त केला. एकाने लिहिले की,”हा छळ आहे”, दुसरा म्हणाला, पोलि‍सांनी या छपरी लोकांना अटक करून त्यांना थर्ड डिग्री ट्रीटमेंट दिली पाहिजे जेणेकरुन ते पुन्हा असा प्रयत्न करणार नाहीत.” तिसरा म्हणाला, उत्तर प्रदेश पोलिस कुठे आहे? चौथा म्हणाला, अशा लोकांना जेलमध्ये टाकले पाहिजे.”

हेही वाचा – Wayanad landslides: भूस्खलनाच्या सहा महिन्यांपूर्वी किती सुंदर दिसत होते वायनाड, मुंडक्काईचे निसर्ग दर्शविणारा Video Viral

पुलाखाली जमाव पांगवण्यासाठी पोलि‍सांनी हस्तक्षेप केला आणि पुरुष आणि महिलेचा छेड काढण्यात सहभागी असलेल्यांची ओळख पट‍वण्याच्या प्रक्रियेत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video in up horror woman on bike harassed by mob on flooded road snk