Viral Video Today: चोऱ्यामाऱ्या करताना काही चोर मंडळी अशा क्लुप्त्या वापरतात की खरंच हा माणूस इतकं डोकं कुठून आणत असेल अशा बुचकळ्यात पडायला होतं. हातचलाखीने समोरच्याला कळूही न देता चोऱ्या करणे हेच टॅलेंट जर एखाद्या चांगल्या कामात वापरलं तर या चोर मंडळींच्या आयुष्याचंही सोनं होऊ शकतं पण कित्येकदा परिस्थितीमुळे किंवा काही वेळा अगदी आळसामुळे चोरीचा मार्ग अनेकजण निवडताना दिसतात. काहींना तर विनाकारण चोऱ्या करण्याची सवय असते. सोशल मीडियावर सध्या अशाच एका भन्नाट चोरट्या काकूंचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अगदी डोक्यावर पदर घेऊन गेलेल्या या महिलेने चक्क सोन्याच्या दुकानात दुकानदाराच्या डोळ्यादेखत भरदिवसा दागिन्यांचा सेट पळवला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहायला मिळत आहे की, एक महिला सोनाराच्या दुकानात ग्राहकाच्या रूपात आली आहे. या बाईचा एकूण पेहराव व चेहऱ्यावरील हावभाव पाहता ही चोरीच्या हेतूने आली आहे का हा प्रश्न दुकानदाराला पडलाच नसावा. यावेळी दुकानात गर्दी दिसतेय, अर्थात यामुळे दुकानातील कर्मचारी व्यस्थ आहेत. याचाच फायदा उचलून ही महिला चोरी करताना दिसत आहे.
दुकानातील कर्मचारी या महिलेला गळ्यातील हार व कानातल्या कुड्यांच्या डिझाईन दाखवत आहे. कर्मचारी जेव्हा सोन्याच्या हाराचा एक बॉक्स बाहेर काढतो तेव्हा तो बघण्यासाठी महिला हातात घेते आणि हळूच आपल्या मांडीवर ठेवते. दुकानातील कर्मचाऱ्यांना तेव्हाही संशय येत नाही. मग ही महिला आणखी डिझाईन दाखवण्यासाठी सांगते आणि तेवढ्या सेकंदाच्या वेळात आपल्या मांडीवरचा बॉक्समधील हार उचलून बॅगेत टाकते. नंतर महिला काहीतरी बहाणा देऊन डिझाईन न आवडल्याने नंतर कधीतरी येईन असे सांगून दुकानातून निघून जाते.
आश्चर्याची बाब म्हणजे ही महिला चोरी करून गेल्यावरही दुकानदार किंवा कर्मचाऱ्यांना तिच्यावर संशय येत नाही. जेव्हा दागिना हरवल्याचे लक्षात येते तेव्हा ही सर्व मंडळी सीसीटीव्ही फुटेज तपासतात व त्यात हा सर्व प्रकार उघड होतो. प्रपात माहितीमनुसार या महिलेने तब्बल लाखभर रुपयांचा हार चोरला आहे.
जादूगाराला लाजवेल अशी चोरट्या काकूंची चपळाई
हे ही वाचा<< Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “
दरम्यान, या महिलेच्या चपळाईने नेटकरी कौतुक करू ही टीका या संभ्रमात अडकले आहेत. ही महिला व्हिडिओमध्ये डोळ्यावर गॉगल व चेहऱ्याला मास्क लावून दिसत आहे, याचा अर्थ सीसीटीव्ही मध्ये चेहरा दिसू नये याचीही तयारी ती आधीच करून आली होती.