Viral Video: सोशल मीडियावर एखाद्या साध्या घरगुती कार्यक्रमात केलेला डान्स सुद्धा व्हायरल होऊ शकतो. अशा कितीतरी व्हिडीओजमधून आजवर अनेकांना प्रचंड प्रसिद्धी लाभली आहे. एका रीलमुळे रातोरात इंस्टाग्राम इन्फ्ल्यूएंसर बनलेल्या कित्येकांची फॅन फॉलोईंग लाखोंमध्ये असते. या व्हायरल व्हिडीओमध्ये सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या क्लिप्समध्ये डान्स व्हिडीओ, कुकिंग व्हिडीओ व ASMR व्हिडिओंचा समावेश आहे. असाच एक डान्स व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात एक साधी सोज्वळ महिला अचानक असं काही रूप धारण करते की तिला बघून नेटकरीही फिदा झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हिडीओ पाहताच तुम्हाला अंदाज येईल हा एखाद्या घरगुती समारंभातील व्हिडीओ आहे. या महिलेने काहीही विशेष मेहनत न घेता निव्वळ नैसर्गिकरित्या दिलेल्या हावभाभावांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. मेरे हसबंड मुझको प्यार नहीं करते या गाण्यावर ही महिला नाचू लागते आणि तिचा चेहरा प्रत्येक सेकंदाला अशी काही जादू करू लागतो की तुम्हालाही नजर काढून घेणं कठीण होईल.

भरसमारंभात नाचू लागली अन्..

हे ही वाचा<<Video: राणादा लग्नात नाचताना झाला बेभान; जमिनीवर बसला, जोरात हात आपटला अन् तेवढ्यात…

या व्हिडीओवरील कमेंटनुसार अलिगढ येथील एका कार्यक्रमातील ही क्लिप असल्याचे समजत आहे. या महिलेने सहज नाचताना तिच्या कुटुंबातील सदस्याने हा व्हिडीओ शूट केला होता. साडी नेसून अगदी छान खांद्यावर पदर घेऊन नाचताना ही महिला धम्माल एक्क्सप्रेशन देत आहे.

@abhinavBebaak या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता याला आतापर्यंत तब्बल २ लाखाहून अधिक व्ह्यूज व हजारो लाईक्स आहेत. अनेकांनी कौतुक करताना या महिलेला संस्कारी आणि नटखट याचं बेस्ट कॉम्बिनेशन असंही म्हंटल आहे. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video indian aunty wearing saree dancing on mere husband mujhko pyaar nahi karte husband reaction went viral svs