Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून तर खूप जास्त संताप येतो. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की काही नागपूरकर तरूण एका फॉरेनरला खर्रा खाऊ घालत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेक जण यावर टिका करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक फॉरेनर दिसेल. त्याच्या अवती भोवती काही तरुण मंडळी उभी आहेत. हे तरण मंडळी फॉरेनरबरोबर मजा मस्ती करताना दिसत आहे. पण पुढे व्हिडीओत जे दिसते ते अत्यंत धक्कादायक आहे. एक तरुण फॉरेनरसमोर खर्रा आणतो आणि त्याला खाण्यास सांगतो. फॉरेनर पहिल्यांदा त्यांच्या सांगण्यावरून चिमुटभर खातो त्यानंतर सर्व जण पुन्हा एकदा म्हणतात, तेव्हा तो पुन्हा चिमूटभर खर्रा खातो. फॉरेनरनी खर्रा खाल्लेला पाहून सर्व तरुण मंडळी जोर जोराने ‘खर्रा खर्रा’ म्हणत ओरडतात. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ

humnagpurkar या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “नागपूरकरांनी इंग्लंडच्या व्यक्तीला खाऊ घातला खर्रा”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माणुसकी कुठे आहे? यालाच अतिथी देवो भव:” म्हणायचं का? तर एका युजरने लिहिलेय, “हे खूप चुकीचं आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. याला शून्य नागरी भावना!” एक युजर लिहितो, “नागपूरचं नाव का खराब करताहेत” तर एक युजर लिहितो, “मी स्वतः व्हिडिओ करताना उपस्थित होतो. यामध्ये कुणालाही जबरदस्ती करण्यात आलेली नाही. तो स्वतःच “I would like to try” असं म्हणाला आणि त्याला विडिओसाठी एकदा परत घेण्यास सांगितले. त्यानंतर, तो संपूर्ण पुडी मित्रासाठी घेऊन गेला.
आज काही लोक या गोष्टीवर विरोध करत आहेत. परंतु ज्यांना “अतिथी देवो भव” ही संकल्पना योग्य वाटते, त्यांनीच आपल्यावर राज्य केले आहे. जर कुणाला खर्रा बिघडलेली गोष्ट वाटत असेल, तर त्यांना नागपूरमधील सर्व पानठेले (टपरी) बंद करावेत. त्याला खर्रा काय असतो, हे सांगूनही, तो म्हणत होता, हे माझ्यासाठी काहीच नाही, मी यापेक्षा खूप जास्त केले आहे.
नागपूरच्या खर्र्याची खास ओळख आहे, आणि त्यावर नाहक वाद निर्माण करणे योग्य नाही.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर टीका केली आहे.

खर्रा हा विदर्भातील गुटख्याचा प्रकार आहे. यात सुपारी, तंबाखू, चुना पदार्थांचे मिश्रण असते. याच्या सततच्या सेवनाने व्यसन निर्माण होऊ शकते जे आरोग्यासाठी चांगले नाही.