तुम्ही मैदानात कबड्डी खेळली आणि पाहिली असेल. पण बर्फावरचा कबड्डीचा सामना तुम्ही पाहिला नसेल. हा पराक्रम आपल्या देशाच्या शूर सैनिकांचा आहे. हिमाचल प्रदेशातील चीन आणि तिबेट सीमेला लागून असलेल्या लाहुल स्पितीच्या समदो भागात उणे अंश तापमानात ITBP जवान बर्फावर कबड्डी खेळत आहेत.
सीमावर्ती भागात सीमेवर लक्ष ठेवल्यानंतर आयटीबीपीचा हिमवीर मोकळ्या वेळेत कबड्डी खेळून मनोरंजन करत आहे. डोंगरावर, जिथे झाडे नसल्यामुळे ऑक्सिजनची कमतरता आहे आणि वरून कडाक्याची थंडी असतानाही सैनिकांचे धैर्य दिसून येत आहे. यापूर्वीही आयटीबीपीच्या हिमवीरांचा एक व्हिडीओ समोर आला होता. तो व्हिडीओही असाच तुफान व्हायरल झाला होता.
(हे ही वाचा: Pune Metro: पुणेरी आजोबानंतर आता मेट्रोमधील आईचा मजेशीर Video Viral)
(हे ही वाचा: Pune Metro: पुणे मेट्रोतील दोन बायकांचा भांडणाचा मजेशीर Video Viral)
बर्फाळ भागात शत्रूपेक्षा सैनिकांना हवानाचा धोका अधिक असतो. मुसळधार हिमवर्षाव, हिमवादळे आणि हिमस्खलन कधीकधी आपत्ती बनू शकतात. या आव्हानांना न जुमानता भारतीय जवानांचा खंबीरपणे आपलं काम करतात. भारतीय सैनिक देशाच्या सेवेत सदैव तैनात असतात. दरम्यान, फावल्या वेळेत मौजमजा करण्याची संधी जवान सोडत नाहीत.
(हे ही वाचा: पीव्ही सिंधूचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral)
भारत-चीन सीमेवरचा परिसरही लेह लडाखला लागून आहे. हिमाचल प्रदेशातील लाहुल स्पिती आणि किन्नौर या दोन जिल्ह्यांचा काही भाग चीनला लागून आहे. येथे आयटीबीपीचे जवान बारीक नजर ठेवून काम करत असतात. प्रतिकूल परिस्थितीतही जवान देशाच्या सेवेत उभे असतात.