ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वॉर्नच्या व्यवस्थापनाने शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होता जिथे तो सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्यानंतर वैद्यकीय पथकाच्या अथक प्रयत्नानंतरही त्याला शुद्धीवर आणता आले नाही. शेन वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले जात आहे. ही बातमी येताच क्रिकेट विश्वात शोककळा पसरली. ही बातमी पाँटिंगला समजताच त्यालाही धक्का बसला. आपला पूर्वीचा जोडीदार आणि चांगला मित्र आता या जगात नाही हे तो अजूनही स्वीकारू शकत नाही.
एका मुलाखतीदरम्यान पॉन्टिंग वॉर्नला श्रद्धांजली वाहत होता, पण यादरम्यान त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत आणि तो भावनिक होऊन रडू लागला.
(हे ही वाचा: Video: स्मृती मानधनाचा ‘हा’ SIX एकदा बघाच; पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया Viral)
या मुलाखतीदरम्यान पाँटिंग म्हणाला, “जगातील इतर लोकांप्रमाणेच मलाही ही बातमी ऐकून धक्का बसला. सकाळी उठल्यावर मला याची माहिती मिळाली. मी माझ्या मुलींना नेटबॉलला घेऊन जावं या विचारात रात्री झोपी गेलो. पण जेव्हा मला जाग आली तेव्हा सर्व काही बदलले होते. ही बातमी पचवायला मला काही तास लागले. वॉर्न माझ्या आयुष्याचा एक भाग होता.”
(हे ही वाचा: पीव्ही सिंधूचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral)
(हे ही वाचा: महाकाय अजगराचा रस्ता ओलांडतानाचा Video Viral; नेटीझन्स म्हणतात असे दृश्य कधीच पहिले नाही)
हा व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांनाही भावूक करत असून जगभरातील चाहते कमेंट्सद्वारे वॉर्नला श्रद्धांजली अर्पण करत आहेत.