TMKOC Viral Video: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही घरोघरी पोहचलेली मालिका ठरली आहे. अलीकडच्या काळात मालिकेतील एपिसोड्सपेक्षा काही वादाचे मुद्देच जास्त चर्चेत आहेत. मालिकेतील काही अभिनेत्रींनी निर्मात्यांवर केलेले आरोप तसेच अनेक जुन्या कलाकारांनी मलिकडे पाठ फिरवणे याचे अनेक किस्से सध्या समोर येत आहेत. याच मालिकेतील जेठालाल व बबिता या जोडीचे अनेक फॅन पेज आहेत तर मीम बनवणाऱ्यांसाठी तर जेठालाल बबिताचे सीन हे टेम्प्लेट्सचा खजिनाच आहेत. सध्या याच दोन पात्रांवरून एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अशोक सराफ निळू फुले यांच्या चित्रपटातील एक सीन जोडलेला आहे. नेमकं हे प्रकरण काय चला पाहूया..
‘गाव तसा चांगला पण वेशीला टांगला’ या विनोदी चित्रपटातील क्लिपमध्ये अशोक सराफ, निळू फुले आणि उषा नाईक दिसत आहेत. अशोक सराफ निळू फुलेंच्या बायकोला बबिता म्हणून हाक मारतात. पण तेवढ्यात निळू फुले त्यांना वहिनी म्हणून हाक मारायला सांगतात. यावर ते आपल्या विनोदी ढंगात हो मी तेच बोलणार होतो पण वेळ तर द्या असे म्हणून बबिता वहिनी अशी खट्याळ हाक मारतात. या क्लिपला एडिट करून त्यावर जेठालाल, बबिता आणि अय्यर अशी नावं देण्यात आली आहेत. गमतीत बनवलेला हा व्हिडिओ पाहून खरोखरच समोर अय्यर, बबिता व जेठालाल असल्याचा भास होत असल्याचे नेटकऱ्यांनी कमेंट करत म्हटले आहे.
Video: अशोक सराफ व जेठालाल कनेक्शन काय?
हे ही वाचा<< स्टारबक्सच्या कॉफीवर बसल्या जागी २१० रुपयांचं डिस्काउंट, कसं काय? ‘हा’ जुगाड पाहून म्हणाल, “काय डोकं”
दरम्यान, तारक मेहता या मालिकेतील सर्व पात्र प्रसिद्ध लेखक तारक मेहता यांच्या उल्टा चष्मा नावाच्या विनोदी कॉलममधील आहेत. याच कॉलममधील पात्रांना हटके रुप देऊन आसित मोदी यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका निर्माण केली. आणि आता मागील १४ वर्ष ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे