Jugaad For Google Interview: कधीकधी अनपेक्षित स्ट्रोकमुळे मोठी धावसंख्या होऊ शकते. सॉफ्टवेअर डिझायनर असलेल्या अक्षय नारिसेट्टीच्या बाबत सुद्धा असेच काहीसे घडले. एका टाईमपास जुगाडातून त्याने एक स्वयंचलित रोबोटिक प्रणाली तयार केली होती. ज्याच्या मदतीने Google Chrome वर इंटरनेट बंद झाल्यावर सुरु होणारा डिनो गेम खेळता येणार होता. पण एकीकडे इंटरनेट बंद होताच अक्षयच्या नशिबाचे टाळे मात्र उघडणार होते याची त्याला कल्पनाही नसावी. या भन्नाट जुगाडाची चक्क गूगला सुद्धा भुरळ पडली आणि मग जे झालं त्याने अक्षयचे आयुष्य बदलले आहे.
काही वर्षांपूर्वी, अक्षय त्याच्या चौथ्या सेमिस्टरच्या परीक्षेचा अभ्यास करत असताना, त्याने त्याच्या लॅपटॉपच्या स्पेसबारवर क्लिक करण्यासाठी रोबोटिक हाताचा प्रोग्राम करण्याची एक कल्पक योजना आणली. डिनो गेम खेळण्यासाठी अक्षयने रोबोटिक हाताच्या सर्व तारा दुसर्या संगणकाला जोडल्या ज्यामध्ये संपूर्ण ऑपरेशन नियंत्रित करणारा कोड होता.
अक्षयच्या DIY रोबोटिक सहाय्यकाच्या प्रयत्नाने फक्त Linkedin वरील लोकच प्रभावित झाले नाहीत तर या प्रकल्पाने गूगकलचे लक्ष वेधून घेतले. सॉफ्टवेअर इंजिनिअरने ट्विटमध्ये सांगितले की, त्याच्या डिनो गेमच्या कल्पनेने त्याला गूगलमध्ये नोकरीची मुलाखत मिळवून दिली आहे. त्याने त्याच्या सेटअपचा व्हिडिओ पोस्ट करताना जाहीर केले, “या प्रकल्पामुळे मला गूगलतर्फे मुलाखतीची ऑफर मिळाली.”
Video: जुगाडाने मिळवून दिला गूगलमध्ये जॉब इंटरव्ह्यू
हे ही वाचा<< ६,६,६..टीम डेव्हिडच्या हॅट्रिकवर सचिन तेंडुलकरची ‘ती’ रिऍक्शन… Video पाहून मुंबई इंडियन्स फॅन्स सुखावले
इंडिया टाइम्सच्या माहितीनुसार, आता अक्षयला गूगलची ऑफर मिळाली की नाही हे अस्पष्ट आहे. पण सध्या अक्षय हैदराबादमध्ये Questbook या कंपनीत काम करत आहे. एका वापरकर्त्याने अक्षयला विचारले की त्याला ही कल्पना कशी सुचली, ज्यावर अभियंत्याने उत्तर दिले, “कल्पना हे आविष्काराचे मूळ आहे परंतु अंमलबजावणी म्हणजे, मी कोडिंग कसे शिकलो हे महत्त्वाचे आहे. संगणकावर कोडिंग करण्यापूर्वी मी प्रथम Arduino वर कोड केले. कोडिंगने सुरुवात झाली आणि मग माझ्या उत्सुकतेनुसार मी शिकत गेलो.”