Bike & Beer: आपल्यापैकी अनेकांना बाईकचे वेड असेल. मागच्या सीटवर बसून बाईकवरुन फिरायला आवडतं अशीही अनेक मंडळी असतील. आलिशान कारपेक्षाही छान थंडगार वारा व निसर्ग अनुभवत बाईकने फिरायला जाणं याची मजाच काही और असते. पण अलीकडे बाईकचे भावही खूप वधारले आहेत. एवढंच नव्हे तर बाईक एकदा घेतल्यावर पुढे पेट्रोलचे दर ऐकून तर चक्रावूनच जायला होतं. पण आता यावर एका हुशार पठ्ठ्याने जबरदस्त जुगाड शोधल्याचे समजतेय. आजवर तुम्ही पेट्रोलला पर्याय म्हणून डिझेल, इलेक्ट्रिक, काही वेळा घरगुती मोटारवर बनलेली स्कुटर/ बाईक पाहिली असेल पण सध्या व्हायरल होणाऱ्या बाईकची एका तरुणाने चक्क बीअरचा वापर केला आहे.
अमेरिकेतील मिशिगन येथील रहिवाशी माइकलसन याला बाईकची खूप आवड आहे. तो नेहमीच वेगवेगळ्या मॉडेलच्या बाईकची खरेदी करत असतो. यावेळी त्याने स्वतःच एका बाईकचा जुगाड केला आहे जी पेट्रोलवर नाही तर चक्क बीअरवर धावते. विशेष म्हणजे माइकलसन हा स्वतः बीअर पिट नाही पण त्याने त्यातून हा जो काही भन्नाट उपयोग शोधून काढलाय तो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार माइकलसन हा प्रयोग पेट्रोल व डिझेलचे वाढते भाव पाहून करायचे ठरवले. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, त्याने इंजिनच्या जागी १४ गॅलॉन केगसह एक हीटिंग कॉइल जोडली आहे. या कॉइलमुळे बीअर, कॉफी व अगदी रेड बुल वावरूनही बाईक सुरु करता येऊ शकते. ही कॉइल या द्रवांना ३०० डिग्रीपर्यंत गरम करते ज्यातून सुपर हिट स्टीम तयार होते. त्याने ही बाईक आपल्याला घरातील गॅरेज मध्येच बनवली आहे. या बाईकचे मायलेज १५० मीटर/प्रतितास आहे. पर्यावरण व बजेटसाठी अगदी उपयुक्त असा हा प्रकार आहे. या बाइकचे व बनवणाऱ्या माइकलसनची सध्या जोरदार चर्चा आहे.
हे ही वाचा<< सचिन तेंडुलकरने भेट दिलेल्या कोकणातल्या फार्म स्टेची झलक; दिवसाचे भाडे, जेवणाची सोय व पॅकेज जाणून घ्या
यापूर्वी ExtreneFails नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन बाईकच्या टाकीमध्ये दारु भरल्याचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत एक तरुण बाईकच्या टाकीत पेट्रोल भरण्याऐवजी दारू ओतत असल्याचं दिसले होते यानंतर गाडी एखाद्या बेवड्याप्रमाणे वाकडीतिकडी पळताना दिसली होती पण ही कल्पना आता या जुगाडू तरुणाने सत्यात उतरवली आहे.