Jugaad Video: आपल्या सर्वांच्या घरात नळ व एक पाण्याची टाकी असते. पूर्वी संपूर्ण बाथरूममध्ये ज्या बादल्या भरून ठेवाव्या लागायच्या ते कष्ट या पाण्याच्या टाकीने कमी केले आहेत. पण जेव्हा या पाण्याच्या टाकीला साफ करण्याची वेळ येते तेव्हा मात्र नाकी नऊ येतात. आता रोजच्या वापरात पूर्ण टाकी रिकामी होतेच असं नाही पण स्वच्छ करायची म्हणजे सगळं पाणी उपसून काढणं गरजेचं आहे. मग ते पाणी ठेवायचं कुठे की सरळ नळ सुरु करून पाणी वाहून जाऊ द्यायचं असे सगळं प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात. पण तुम्हाला माहित आहे का एका तरुणाने चक्क पाण्याची टाकी रिकामी न करता स्वच्छ कशी करायची याचा भन्नाट जुगाड शोधून काढला आहे. हा व्हिडीओ पाहून सध्या अनेकजण या हुशारीचे कौतुक करत आहेत.
युट्युबवर @ACA TECHNOLOGIES या पेजवर हा व्हिडीओ पहिल्यांदा पोस्ट करण्यात आला होता. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा घरातील पाण्याची टाकी विना पाणी काढता कधी स्वच्छ करायची हे शिकू शकता. यामध्ये तरुणाने एक भन्नाट जुगाडू यंत्र बनवले आहे. तो प्लास्टिकची बॉटल अर्धी कापून त्याला साधा पीवीसी पाईप व रबरचा पाईप जोडतो. बॉटलचा मागचा भाग टाकीच्या आत टाकायचा आहे, पाईप जमिनीवर सोडून द्यायचा आहे व मग आपोआपच टाकीच्या तळातील घाण थोड्या थोड्या पाण्यासह निघून बाहेर येताना दिसेल.
टाकी रिकामी न करता केली स्वच्छ, जुगाड Video
हे ही वाचा<< ट्रेन ‘या’ शब्दाचा फुल फॉर्म माहितेय का? तुमच्या रेल्वे तिकिटावरील ‘या’ अक्षरांचे खरे अर्थ जाणून घ्या
दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तरुणाच्या हुशारीचे कौतुक केले आहे. व्हिडिओवर व्ह्यूज केवळ ६६ हजार असले तरी कमेंटमध्ये अनेकांनी या ट्रिकचा आपल्याला फायदा झाल्याचे म्हंटले आहे. तुम्हाला हा जुगाड कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.