Reduce Belly Fats Viral Video: पोटावरच्या फॅट्स कमी करण्यासाठी काय करावे हा नेहमीच टॉप सर्च मध्ये राहिलेला विषय आहे. यासाठी लोकं कुठल्याही थराला जाऊन डाएट, जिम, असे सगळे प्रकार करून पाहतात. असाच एक पोट कमी करण्याचा जुगाडू व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्विटरवर चिराग बडजातिया याने “मी सांगतोय, या देशात खूप गोष्टींना प्रचंड स्कोप आहे” अशा कॅप्शनसह पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये एक्यूप्रेशर ट्रेनर वर्ग घेत असल्याचे दाखवले आहे. वजन कमी करण्यासाठी ही मंडळी जी भन्नाट निंजा टेक्निक वापरत आहेत ते पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा प्रकार इतका प्रगत आहे की आपण २०३० मध्येच जगत असल्याचा भास होतोय असे वाटत असल्याचे काही जण म्हणतायत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

द परफेक्ट हेल्थ हैदराबादच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केलेला व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ साधारण 5.5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. यामध्ये ऍक्युप्रेशरच्या पद्धतीने वजन कमी करण्यासाठी पोटावर चक्क लाटणे फिरवले जात आहे. ही कल्पना प्रत्यक्षात करणाऱ्या लोकांना सुद्धा मजेशीर वाटत असावी कारण प्रत्येकजण या व्हिडिओमध्ये खळखळून हसताना दिसत आहे.

Video: लाट्या बाई लाट्या…

हे ही वाचा<< दारुड्याने पार केली हद्द! बैलावर बसून वेगाने रस्त्यात स्टंटबाजी; Video मध्ये घेतलेलं नाव ऐकून लोकं चिडली

दरम्यान, हा अव्हिडीओ व्हायरल झाल्यावर यावर अनेकांनी कमेंट करून मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत, “आशा आहे की पुन्हा हे लाटणे किचनमध्ये वापरले जाणार नाही”, “ही पद्धत छान आहे, आता एक काम करा व्यायामाच्या आधी पीठ आणि पाणी खाऊन मग पोटावर असे लाटणे फिरवा जेणेकरून पोळी बनवणे व खाण्याचे कष्ट तरी वाचतील”. “वाह्ह उत्तम आहे, जर पोळी बारीक होऊ शकते तर पोट का बारीक होणार नाही?” अशा प्रकारच्या कमेंट या व्हिडिओखाली दिसत आहेत. आता हा वजन कमी करण्याचा योग्य मार्ग आहे की नाही हे कुठेही सिद्ध झालेले नाही पण गमंत म्हणून हा व्हिडीओ पाहून मज्जा वाटते हे नक्की.