अंकिता देशकर

Video Jammu- Kashmir Terrorist Arrested: जम्मू काश्मीरमध्ये भररस्त्यात एका दहशतवाद्याला पोलिसांनी पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कौतुकास्पद कामगिरीला पाहून नेटकरी सुद्धा भारावून गेले आहेत. तुम्ही पाहू शकता, व्हिडिओमध्ये एक पोलिस व्हॅन बाईकवरून येणाऱ्या व्यक्तीला थांबवून त्याला पकडताना दिसत आहे. हा व्हिडिओ जम्मू-काश्मीरचा असल्याचा दावा केला जात आहे आणि त्यात पोलीस जम्मू-काश्मीरच्या रस्त्यावर एका दहशतवाद्याला पकडताना दिसत आहेत.

A bull attacked a scooter driver who came under the truck viral video on social media
बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Police found dead body of a boy in lake but shocked as he suddenly start speaking shocking video
VIDEO: हे कसं झालं? तलावात पडलेला ‘मृतदेह’; पोलिसांनी बाहेर खेचताच अचानक उठून बोलू लागला
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
Vijay Deverakonda fell down the stairs video goes viral on social media
Video: जिना उतरताना जोरात पडला विजय देवरकोंडा, व्हिडीओ होतोय व्हायरल
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
salman khan lawrence bishnoi
पुन्हा धमकी, पुन्हा बिश्नोई गँग; सलमान खानच्या नावाने मुंबई पोलिसांना आला संदेश!

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Gaurav Kushwaha ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील हाच व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हायरल व्हिडिओ InVid टूलमध्ये अपलोड करून आमची तपासणी सुरू केली. आम्हाला त्यातून काही कीफ्रेम मिळाल्या. आम्ही सर्व कीफ्रेम्सवर स्वतंत्रपणे Google रिव्हर्स इमेज शोध घेतला. इथून आम्हाला redd.tube नामक एका वेबसाईटकडे निर्देशित करण्यात आले. जिथे ‘पोलीस संशयिताचा पाठलाग करतो’ या मथळ्याखाली व्हिडिओ शेअर केला होता.

https://www.redd.tube/video/3f3371487a3d4deed624d45af04583160ceeb4c1

या व्हिडिओचा स्रोत तपासताना आम्हाला reddit.com वर शेअर केलेला व्हिडिओ आढळला. आम्ही त्यावरील कमेंट्स तपासल्या. कमेंट्स मधून आम्हाला कळले कि हा व्हिडिओ ब्राझीलचा आहे. त्यानंतर आम्ही, ‘Brazil cop kicks suspect’ असे किवर्डस वापरून विडिओ चा तपास केला. यावरून आम्हाला एक युट्युब विडिओ सापडला.

व्हिडीओ चे शीर्षक होते: Brazilian Cop Delivers Flying Kick to Dirt Biker (Credit Oliver Lopez) हा व्हिडिओ एक वर्षापूर्वी अपलोड करण्यात आला होता. आम्हाला या बाबतीत काही बातम्या देखील मिळाल्या.

अहवालात नमूद केले आहे: व्हिडिओमध्ये एक 17 वर्षीय मोटारसायकलस्वार पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. 25 व्या बटालियनचे पोलिस पथक शहराच्या मध्यवर्ती भागात गस्तीवर असताना, संध्याकाळी ७: ५५ च्या सुमारास, त्यांना एक मोटारसायकलस्वार संशयास्पद स्थितीत दिसला.

आम्ही बातमीच्या लेखाचे शीर्षक कॉपी-पेस्ट केले आणि ते YouTube वर शोधले. आम्हाला RICtv चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडिओ सापडला. इथे हीच घटना वेगळ्या अँगल नि देखील बघायला मिळते.

हे ही वाचा<< ज्योती मौर्य प्रकरणाला वळण; चॅट्स व्हायरल होताच ज्योती म्हणाल्या, “आलोक ५० लाख मागतोय, १० महिन्यांआधीच..”

निष्कर्ष: जम्मू आणि काश्मीरमधील एका दहशतवाद्याच्या नाट्यमय अटकेचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षात ब्राझीलचा आणि जुना आहे. व्हायरल दावा खोटा आहे.