लहान मुलांमधील निरागसता अनेकदा आपलं मन जिंकुन घेते. असेच मन जिंकणाऱ्या घटनेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये येशू ख्रिस्त यांच्या जन्माचा प्रसंग दाखवणारे नाटक काही लहान मुलं सादर करत असल्याचे दिसत आहे. यावेळी नाटकाचा भाग म्हणून येशू ख्रिस्त यांचे बालपणातील रूप दाखवणारा एक बाहुला सर्वांसमोर दाखवला जातो. यावर तिथे उपस्थित असणारी एक चिमुकली अनपेक्षित प्रतिक्रिया देते, जी पाहून सर्वांना हसू अनावर होते.
स्टेजवर उपस्थित असणाऱ्या मुलांपैकी एक चिमुकली तो बाहुला पाहताच त्याला उचलून घेते आणि स्टेजवरच त्याच्याशी खेळू लागते. हे पाहून आधी सर्वजण अचंबित होतात पण नंतर या मुलीची निरागसता पाहून सर्वजण हसू लागतात. स्टेजवरील इतर मुलं तिच्याकडुन बाहुला परत मिळवण्याचा प्रयत्न करतात, पण ती त्यांना विरोध करत खेळणं सुरूच ठेवते. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
व्हायरल व्हिडीओ:
या लहान मुलीची ही अनपेक्षित प्रतिक्रिया पाहून उपस्थितांमध्ये हशा पिकला. नेटकऱ्यांनीही या चिमुकलीच्या निरागसतेचे कौतुक केले आहे. या व्हिडीओला २७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.