Kim Kardashian Weird Sink Video: मॉडेल, बिझनेस वुमन किम कार्दशियन हिने आपल्या ६० दशलक्ष डॉलरच्या घराचा लुक आपल्या फॅन्ससह शेअर केला. २०१४ मध्ये किम व कान्ये या दोघांनी हे घर २० दशलक्ष डॉलरमध्ये खरेदी केले होते, परंतु कार्दशियनची आई क्रिस जेनरने एप्रिल २०१८ मध्ये ट्वीट करत घराची किंमत ६० दशलक्ष डॉलर होती असे सांगितले. किम व कान्येच्या घटस्फोटादरम्यान कार्दशियनने घर आणि त्यातील सर्व सामान वेस्टकडून २३ दशलक्ष डॉलरमध्ये विकत घेतले. आता याच घरात किम तिच्या चार मुलांसह राहत आहे. किमने घराचे फोटो व्हिडीओ शेअर केल्यावर या महालातील किचन सिंकविषयी जाणून घेण्यात अनेकांना उत्सुकता होती. याचे मुख्य कारण म्हणजे किमने दाखवलेल्या सिंकला फक्त नळच दिसत आहेत मुळात बेसिनचे भांडे यात दिसतच नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

किमच्या घरातील ही विचित्र सिंक पाहून कोड्यात पडलेल्यांना आता तिने स्वतः व्हिडीओ बनवून उत्तर दिले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की हे सिंक म्हणजे आपल्या घरातील किचनच्या ओट्याप्रमाणे आहे. ज्यावर एक काळया रंगाचा फॅन्सी नळ बसवला आहे पण खाली बेसिनचे भाडे दिसत नाही. किमने सांगितल्याप्रमाणे हे एक मॉडर्न तंत्रज्ञान आहे. यात ओटा हा थोड्या स्लोप (उताराने) बनवला आहे. आणि त्यात एक खाच दिली आहे म्हणजे जेव्हा नळ उघडून पाणी सुरु होईल तेव्हा ते पाणी थेट खाचेतून खाली असलेल्या ड्रेनेज मध्ये जाऊ शकते. बेसिनचे भांडे नसले तरी यात पाणी उडत नाही किंवा वाचूनही राहत नाही असेही किम या व्हिडिओमध्ये म्हणाली आहे.

Video: किमच्या घरातील विचित्र सिंक होतेय Viral

हे ही वाचा<< Apple स्टोअरमध्ये चोरी! ४ कोटींचे आयफोन गायब; मनी हाईस्ट स्टाईलच्या चोरांचा फंडा जाणून व्हाल थक्क

किम सांगते की, एक्सेल व्हर्वूर्ड आणि वास्तुविशारद क्लॉडिओ सिल्वेस्ट्रिन यांनी हे सिंक डिझाईन केले आहे. तुम्हाला किमच्या महालातील हा भन्नाट मॉडर्न प्रयोग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.