‘लोकवस्तीत बिबट्या शिरल्याने नागरिकांची पळापळ’ वगैरे हेडलाईन्स मुंबईसारख्या शहरात राहणाऱ्या लोकांना फार क्वचित पाहायला मिळतात. अगदीच बोरिवलीच्या नॅशनल पार्कजवळच्या सोसायट्यांमध्ये बिबट्या घुसला तर मोठी न्यूज् होते (आणि नागरी वस्तीत बिबट्या घुसतोच का वगैरे प्रश्न विचारणारे बिनडिग्रीचे शहरविकास तज्ञ मग खोऱ्याने सापडतात)

पण ग्रामीण भागात वन्यजीवांचा लोकवस्तीमधला वावर ही एक नेहमीची गोष्ट आहे. आजीआजोबांकडून तर या अशा अनेक गोष्टी तर आपण एेकतोच. गावातल्या ग्रामस्थांना यामुळे अतिशय जपून राहावं लागतं. आंध्र प्रदेशातले जंगली हत्ती दरवर्षी कोकणात घुसत तिथली शेती उध्वस्त करतात, गावकऱ्यांवर हल्ले करतात. देशाच्या जंगली भागालगत असणाऱ्या खेड्यांमध्ये वाघ, बिबट्या अशी हिंस्त्र जनावरं वरचेवर शिरतात.

असाच एक व्हिडिओ नेटवर व्हायरल झाला आहे. ईशान्य भारतातल्या एका खेड्यात बिबट्या शिरल्याने तिथे धावपळ उडाली. त्यातूनही हा बिबट्या गावातल्या एका घरात शिरला. प्रणिता दास या महिलेच्या घरात हा बिबट्या शिरला. त्यावेळी प्रणिता दास त्यांचे पती आणि मुलांसोबत सकाळचा नाश्ता करत होत्या. अचानक बिबट्या घरात घुसल्याने या सगळ्यांची तारांबळ उडाली. या बिबट्याने या कुटुंबावर हल्ला चढवला आणि यात प्रणिता दास यांच्या मानेवर त्याचा पंजा लागबन मोठी जखम झाली.

जंगली बिबट्याच्या तावडीत सापडलेलं हे कुटुंब कसंबसं त्यांच्या घराबाहेर पडलं आणि त्यांनी घराचं दार बाहेरून लावून घेतल्याने हा बिबट्या आता कोंडला गेला. जखमी झालेल्या प्रणिता दास यांनी मग आरडाओरड करत गावकऱ्यांना जमवलं. गावकऱ्यांनी त्यांच्या घरातून लाठ्याकाठ्या आणत या बिबट्याला चोपण्याची तयारी केली. पण तेवढ्यात वनविभागाचे कर्मचारी आले आणि त्यांनी बिबट्याला गुंगीचं औषध देत पिंजऱ्यात कोंडलं. पाहा या घटनेचं तिथल्या काही गावकऱ्यांनी केलेलं रेकाॅर्डिंग

सौजन्य- यूट्यूब

बिबट्यांनी मानवी वस्तीत शिरण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बेसुमार जंगलतोड आणि वाढत जाणारी शहरं यामुळे वन्यजीव आपल्या घरात नाही तर आपणच त्यांच्या घरात जात त्यांना बाहेर काढू पाहतोय.

[jwplayer Z85FJ7mL]

Story img Loader