Pune Viral Video : पुणे हे शहर ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे आणि शहराजवळची गडकिल्ले येथील इतिहास सांगतो. पुणे दर्शनासाठी दर दिवशी हजारो लोक येतात. प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू तसेच गडकिल्ल्यांना भेट देतात. अनेकांना ट्रेकिंग आणि गडकिल्ले भटकंती करायला आवडते. जर तुम्ही पुण्याजवळील तोरणा किल्ल्याला भेट द्यायचा विचार करत असाल तर थांबा आणि हा व्हिडीओ आधी पाहा. सध्या सोशल मीडियावर तोरणा किल्ल्यावरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तोरणा किल्ल्यावर बिबट्याने दर्शन दिल्याचा दावा केला जात आहे. (Video Leopard Spotted on Torana Fort Near Pune: Trekkers Beware viral video on social media)
ट्रेकिंगला जाताना काळजी घ्या…
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला तोरणा किल्ला दिसेल. हा व्हिडीओ अतिशय उंचावरून शूट केला आहे. पुढे कॅमेरा झूम केला जातो तेव्हा तोरणा किल्ल्यावर बिबट्या दिसतोय. विशेष म्हणजे काही अंतरावर प्रवासी चढताना दिसत आहे. तोरणा किल्ल्यावर जाताना काळजी घ्या अशा आशयाचे संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिबट्या हा शब्द जरी उच्चाला तरी अंगावर काटा येतो अशा वेळी ट्रेकिंग करताना सुरक्षेचे भान ठेवणे सुद्धा गरजेचे आहे. खरंच तोरणी किल्ल्यावर बिबिट्या फिरतोय का? आणि हा व्हिडीओ कधीचा आहे, याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
_punethings या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तोरणा किल्ल्यावर फिरायला जाताना सावधान! बिबट्याने दिले दर्शन.” या व्हिडीओवर काही युजर्सनी प्रतिक्रिया सुद्धा दिल्या आहेत.
तोरणा किल्ला
तोरणा हा पुणे शहरापासून फक्त ६० किमी अंतरावर आहे. सह्याद्रीच्या डोंगरामध्ये वसलेला हा ऐतिहासिक तोरणा किल्ला अतिविशाल किल्ला म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी जिंकलेला हा पहिला किल्ला होय. या नैसर्गिक सौंदर्याने वेढलेला आणि वेळवंडी आणि कानद नदीच्या या दोन नद्यांच्या खोऱ्यात वसलेला का किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदु आहे. अनेक शिवप्रेमी व गडप्रेमी या किल्ल्याला भेट देतात.