Lion Viral Video: बाहेर कोणी कितीही वाघ-सिंह असला तरी घरी आल्यावर बायकोच खरी बॉस असते हे आजवर अनेकदा आपणही ऐकलं असेल. काही माणसांच्या बाबत आपण हे वाक्य खरं होताना पाहिलंही असेल. खरंतर यामध्ये कमीपणाचा प्रश्नच येत नाही कारण नवरा-बायको हे नातं एकाने चुकल्यावर दुसऱ्याने सावरून घेण्याचं असतं, हो म्हणजे आता ही सावरून घेण्याची पद्धत प्रत्येक जोडप्यावर बदलते हे सांगायला नको. अशाच एका जोडप्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की फक्त माणसाची बायको त्याला धाकात ठेवत असेल तर हा व्हिडीओ नक्कीच तुम्हाला थक्क करून जाईल.
@earthlogas या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला एक सिंह जोडप्याचं चांगलंच वाजलं आहे. यात जंगलाचा राणी सिंहीण चिडल्यावर राजा सिंह असा रडकुंडलीला आला आहे की ते बघून तुम्हालाही त्याची दया येईल. आपल्याला या जोडप्याच्या वादाचे कारण जरी कळू शकले नसले तरी ज्या पद्धतीने सिंहीण डरकाळ्या फोडून त्याच्याशी भांडत आहे ते बघून कदाचित तो तिच्या माहेरच्यांना उलट बोलला असेल असे मजेशीर अंदाज नेटकरी बांधत आहेत.
Video: बायकोसमोर हुशारी नाही
हे ही वाचा<<कलियुग रे बाबा! सिंहाच्या पाठीवर बसून निघालं माकड; जंगलाच्या राजाने एका क्षणात दिला आयुष्याचा धडा
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अनेकांनी कॅप्शन एकदम परफेक्ट असल्याचे म्हंटले आहे. तो भलेही जंगलाचा राजा असला तरी खरी बॉस कोण हे सिंहीण दाखवून देते. काहींनी सिंहाचं कौतुक करून ती एवढं मारतेय तरी एका बाईवर हात उचलायचा नाही या नियमाचे पालन सिंहही करतोय असे म्हंटले आहे. एका युजरने ही सिंहीण गरोदर असल्याचाही अंदाज वर्तवला आहे. या व्हायरल व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज व कमेंट्स मिळाल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ बघून कुणाची आठवण आली हे कमेंटमध्ये कळवा.