Viral Video: आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सोशल मीडियावर जितकी टीका होते तितकेच प्रेम त्यांचे समर्थक देत असतात. याचाच प्रत्यय आणून देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. खरंतर एक चिमुकली लांब प्रवास करून केजरीवाल यांना भेटायला गेली होती मात्र तिची निराशा झाली व नाराज होऊन परतताना ती अक्षरशः रडूच लागली. या व्हायरल व्हिडीओवर स्वतः केजरीवाल यांनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली आहे. हे नेमकं प्रकरण काय जाणून घ्या..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक लहान मुलगी डोक्यावर आम आदमी पक्षाची टोपी घालून रडताना दिसत आहे तर आजूबाजूची सर्व मंडळी तिची समजूत घालत आहेत. आम आदमी पक्षाचे राज्य संयोजक व अभिनेते वासीगरन यांनी हा व्हिडीओ शेअर करून याबद्दल माहिती दिली की, ही लहान मुलगी केजरीवालजींच्या स्वागतासाठी तिरुवन्नमलाईपासून चेन्नईपर्यंत आली होती. प्रचंड गर्दीमुळे ती केजरीवाल यांना पाहू शकली नाही, आपली भेट न झाल्याने ती रडू लागली.

या व्हिडिओची दखल घेत केजरीवाल यांनी सुद्धा उत्तर दिले आहे. हि चिमुकली किती गोड आहे, जर ती आल्याचं मला हे मी तिथे असतानाच माहीत असतं तर मी नक्की तिची भेट घेतली असती असे म्हणत केजरीवाल यांना व्हिडीओ पोस्ट केला आहे तर आपल्याला या मुलीशी बोलायचे आहे जर कोणी तिच्या आई वडिलांचा मोबाईल क्रमांक देऊ शकेल तर नक्की सांगा असेही पुढे केजरीवाल म्हणाले आहेत.

पाहा व्हायरल व्हिडीओ

दरम्यान, दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी सरकारला अलीकडेच विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाचा सामना करावा लागला होता अरविंद केजरीवाल सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडून भाजपाने आपचा एकही आमदार फोडला नाही, हे सिद्ध केले होते.