Shocking video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ मगरीचा व्हिडीओ आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की मगर ही सगळ्यात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. मगरींबद्दल बोलायचे झाले तर मगरी तर भयानक असतात. मगरींमध्ये सिंहाचीही शिकार करण्याची शक्ती आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओही तुम्ही पाहिले असतील, ज्यात मगरी मोठ मोठ्या प्राण्यांची शिकार करताना दिसतात. दरम्यान सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक माणूस बिनधास्त मगरीला खांद्यावर घेऊन जाताना दिसत आहे. एवढ्या धोकादायक प्राण्याला बिधांस्तपणे कुणी कसं आपल्या खांद्यावर घेऊन जाऊ शकतं, असं तुम्हालाही वाटेल. मात्र हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.
मगर दिसल्याने गेल्या काही आठवड्यांपासून गावातील लोक चिंतेत होते. यावेळी घाबरलेल्या गावकऱ्यांनी मगरीला पकडण्यासाठी वनविभागाला बोलावले. यानंतर वनविभागातून आलेल्या व्यक्तीनं एकट्याने मगरीला खांद्यावर घेऊन शेतातून बाहेर नेले. उपस्थितांनी या घटनेचे चित्रीकरण करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवून प्रदीर्घ संघर्षानंतर सरपटणाऱ्या प्राण्याला जेरबंद करण्यात यश मिळवले. मगरीला खांद्यावर घेऊन जाण्यापूर्वी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तिचे तोंड आणि हातपाय कापड आणि दोरीने बांधले. त्या माणसाने न घाबरता मगरीला खांद्यावर घेऊन शेतातून बाहेर काढले. मगरीची सुटका करण्यात आली आणि नंतर ती मगरी जिथे होती तिथे सोडून देण्यात आली.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> आता तर हद्दच पार केली! भर बाजारात ब्रा घालून तरुणानं महिलांसमोर…; संतापजनक VIDEO पाहून धक्का बसेल
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्या व्यक्तीने मगरीला खांद्यावर कसे बांधले आहे. त्याच्याकडे बघून तो मगरीला घाबरतो असे अजिबात वाटत नाही. त्या माणसाने आधी मगरीच्या तोंडाला दोरी बांधली, नंतर खांद्यावर घेऊन नदीकडे नेले. व्हिडिओमध्ये मगर एकदम शांत आहे. काही लोकांनी या व्यक्तीचं हे पाऊल अत्यंत धोकादायक ठरवले असून तज्ञांच्या मदतीशिवाय मगरीला उचलणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असल्याचे म्हटले आहे. तर नेटकऱ्यांनी त्याच्या या धाडसी कृतीचे कौतुक केले आहे. तर एकानं कमेंट केलीय की, “हे फक्त भारतातच घडू शकतं.”