Heart Attack While Warming Up At Gym: ब्रिटनमध्ये कोरोना लसीबाबत झालेल्या खुलाशांच्या दरम्यान, वाराणसीमध्ये जिम करत असताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येणे, जी सावरण्याची संधीही देत नाही आणि लोकांचे प्राण घेत आहे.यापूर्वी कॉमेडियन राजू श्रीवास्तव, सुप्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत राजकुमार आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचाही व्यायामादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू पावलेल्या अशा लोकांची यादी खूप मोठी आहे. दरम्यान अशीच एक घटना समोर आली आहे. वाराणसीमध्ये जीममध्ये व्यायाम करत असताना एका तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. याचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून जीममध्ये व्यायाम करताना तुम्हीही ही चूक करत नाही ना हे जरुर पाहा.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा