Viral Video Today: काही लोकं ‘People Pleaser’ असतात असं म्हणतात, म्हणजेच काय तर इतरांना खुश ठेवण्यासाठी ही मंडळी कुठल्याही थराला जाऊ शकतात. याची एक बाजू म्हणजे आपण कसे इतरांपेक्षा सरस आहोत हे दाखवणं यांना महत्त्वाचं वाटत असावं. कारण काहीही असलं तरी असा भलताच अतिउत्साह कसा अंगाशी येऊ शकतो हे आता समोर येत आहे. अलीकडेच डॉक्टरांनी एका रुग्णाचा पराक्रम युट्युबवर शेअर केला आहे. युट्युबवर डॉ. बर्नार्ड यांनी सांगितले की, त्यांच्या एका रुग्णाने १० मिनिटात चक्क १२ कोल्ड्रिंकचे कॅन फस्त केले होते. बरं याचं कारण काय तर या पठ्ठ्याला आपल्या एका सह कर्मचाऱ्यासमोर मिरवायचं होतं, या हट्टापायी आता या ३६ वर्षीय गेमरच्या आतड्या व अवयवांची कशी अवस्था झाली आहे हे सुद्धा डॉक्टरांनी दाखवले आहे.
डॉ हसू हे क्लिनिकल फार्मासिस्ट आहेत जे Chubbyemu नावाचे Youtube चॅनल देखील चालवतात. त्यांचे 2.68 मिलियन सबस्क्राइबर आहेत, या चॅनेलवर ते आपल्या रुग्णांचे भन्नाट किस्से व अविश्वसनीय तक्रारी सांगतात. काही प्रकरणं तर इतकी विचित्र आहेत की त्यांच्यावर विश्वास ठेवणं स्वतः डॉक्टरांनाही शक्य होत नाही. असाच काहीसा प्रकार अलीकडे डॉ. बर्नार्ड यांनी सांगितला आहे.
डॉक्टरांकडे एक ३६ वर्षीय पोकीमॉन प्रेमी रुग्ण अलीकडेच पोटदुखीची तक्रार घेऊन आला होता. तब्येतीने थोडा गुबगुबीत असल्याने त्याला आयुष्यभर टोमणे ऐकावे लागले होते असेही डॉक्टर बर्नार्ड यांनी नमूद केले. या रुग्णाने अलीकडेच एका सह कर्मचाऱ्याला दाखवण्यासाठी १० मिनिटात १२ कोल्ड्रिंक कॅन खाली केले होते, यानंतर काही वेळ त्याला पोट व पाठ दुखीची समस्या जाणवत होती, तसेच छातीत जळजळही वाढू लागली होती, अशावेळी आराम मिळेल या अपेक्षेने या पठ्ठ्याने थोडं मद्यपान करायचं ठरवलं पण दारूचा घोट घेताच त्याला उलटी झाली. यानंतर बराच वेळ त्याला काही खाता- पिता येत नव्हतं इतकंच काय तर साधं उभं राहणंही जमत नव्हतं. अशा परिस्थितीतही तो डॉक्टरांकडे न जाता गेम खेळत बसला होता, हेच दुर्लक्ष करणं आता त्याला चांगलंच अंगाशी आलं आहे.
त्याने १० मिनिटात खाली केले १२ एनर्जी ड्रिंक अन मग..
हे ही वाचा << १४ जणांच्या जेवणाचं बिल १ कोटी ३६ लाख! सॉल्ट बेने शेअर केला बिलाचा फोटो; बघा ‘यांनी’ खाल्लं तरी काय?
डॉक्टरच्या माहितीनुसार या रुग्णाला आता स्वादुपिंडाचा गंभीर आजार झाला आहे. शरीरात 12 कॅनमधील साखर आणि कॅफिनचे अतिरिक्त प्रमाण शिरताच स्वादुपिंडाने स्वतःलाच पचवण्यास सुरुवात केली आहे. डॉ हसू यांनी सांगितले की जेएसचे स्वादुपिंड सुजले होते व आता यकृत आणि मूत्रपिंड निकामी होऊ लागले आहे. उपचारांदरम्यान समोर आले की या रुग्णाला आधीच डायबिटीजचा त्रास होता आणि अशात त्याने एनर्जी ड्रिंकचे अतिरिक्त सेवन केल्याने त्याचा जीव धोक्यात आला.