Viral Video: सोशल मीडियावर दरदिवशी डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. एखाद्या सुंदर तरुणीचा व्हिडीओ व्हायरल व्हायला तर काही सेकंदही पुरतात. अलीकडेच तुम्ही लता मंगेशकर यांच्या ‘मेरा दिल ये पुकारे आजा’ या गाण्यावर आपल्या अदांनी सर्वांना भुरळ टाकली होती. तिचा डान्स व्हायरल होताच या जुन्या गाण्याची सुद्धा क्रेझ वाढली होती. आता एका साधारण पन्नाशीतल्या काकांचा असाच एक नाचतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. काही महिन्यांपूर्वी तुफान ट्रेंड झालेलं गाणं ‘यार मेरा तितलियां वर्गा’ या गाण्यावर या काकांनी कमाल डान्स केला आहे. त्यांचा डान्स बघून तर तुम्ही या गाण्याची मूळ कोरिओग्राफी सुद्धा विसरून जाल.
व्हायरल व्हिडीओ पाहता कोणत्यातरी लग्नातील असल्याचं दिसतंय. यात एक काका सुपरहिट पंजाबी गाण्यावर डान्स करत आहेत. गाण्याचे बोल व काकांच्या स्टेप्स इतक्या परफेक्ट जुळतायत की हा मूळ व्हिडीओ असल्याचं वाटत आहे. तुम्ही बघू शकता की जसे काका थिरकायला सुरुवात करतात त्यांना बघण्यासाठी स्टेजवरची सगळी मंडळी सुद्धा स्टेजखाली येऊन प्रेक्षक बनून जातात.
असा डान्स होणे नाही…
इंस्टाग्रामवर संदीप कुमार (sk2410722) या अकाउंटवर हा व्हिडीओ मागील आठवड्यात पोस्ट करण्यात आला होता आतापर्यंत या रीलला तब्बल ४५ लाखाहून अधिक व्ह्यूज आहेत. ३ लाख ५० हजार लाईक्स व ५ हजराहून अधिक कमेंट या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत. अनेकांनी यावर कमेंट करून काकांच्या उत्साहाचे व ऊर्जेचे कौतुक केले आहे. वय ५५ व मनात बालपण अशी या व्हिडीओवरील कमेंट खरोखरच या व्हिडिओतील उर्जेला साजेशी ठरते.
हे ही वाचा<< मुलीच्या जन्माने हादरलं कुटुंब; पायगुण नव्हे तर ‘हे’ पाय बघूनच डॉक्टर झाले थक्क, पाहा Viral फोटो
तुम्हाला काकांचा तुफान डान्स कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा!