How To Hide Bald Spots: केसगळती ही अलीकडे खूप कॉमन समस्या झाली आहे. प्रत्येक पाच लोकांमध्ये तीनजण तरी प्रमाचा बाहेर केस गळणे, टक्कल पडणे अशा त्रासांनी वैतागलेले असतात. धुताना, विंचरताना, बांधताना केस गळणे हे खरंतर सामान्य आहे पण या गळतीचे प्रमाण जर अति असेल तर तुम्हाला तज्ज्ञांची भेट घ्यावी लागेल. तज्ज्ञांनी दिलेले उपाय सुद्धा काम करण्यासाठी काही वेळ लागेलच. पण तत्पूर्वी जर तुमच्याही डोक्यावर स्पष्ट दिसणारे टक्कल पडले असेल तर आता व्हायरल होणारा जुगाड आपण एकदा पाहायलाच हवा. एका तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. काही सेकंदात या व्यक्तीने आपलं टक्कल झाकलं आहे आणि ते ही कोणत्या विग किंवा पावडरशिवाय. आता हे कसं शक्य झालं व्हिडिओमध्ये पाहूया..
@viralinmaharashtra या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला आतापर्यंत ३० हजाराहून अधिक व्ह्यूज आहेत. यामध्ये एक तरुण आपल्या डोक्यावरील टक्कल दाखवतो आणि पापणी लवण्याच्या वेगात त्याच्या डोक्यावर पुन्हा केस दिसून येतात. विशेष म्हणजे ज्या प्रकारचे टक्कल या तरुणाने दाखवले आहे तो प्रकार सध्या बराच कॉमन झाला आहे. यामध्ये तुम्हाला टाळूवर टक्कल पडते पण कानाच्या वरचे म्हणजेच डोक्याच्या कडांचे केस मात्र मोठे वाढतात. एकही पैसा न खर्च करता या तरुणाने गेलेला लुक कसा परत मिळवला पाहा…
Video: टक्कल लपवण्याचा जुगाड व्हायरल
हे ही वाचा<< बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना बघून महिला झाली बेभान; मिठी मारली, किस केलं अन्… Video पाहून भक्तही थक्क
दरम्यान या व्हिडिओवर लिहिल्याप्रमाणे तुम्हालाही आता कल्पना आली असेलच की हा व्हिडीओ नक्की कोणासाठी बनला आहे. तुमच्या अशाच मित्रमैत्रिणींना हा व्हिडीओ शेअर करायला विसरू नका. आणि हा जुगाड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.