Viral Video Today: गरज ही शोधाची जननी असते असं म्हणतात. आजवर आपण भारतात अनेक जुगाडू प्रयोग पाहिले आहेत. त्यातीलच एक नवा प्रकार सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात उन्हाळ्यात अनेक गावी पाणी आणण्यासाठी दूर जावे लागते. बरं एखाद्या विहिरीत पाणी दिसलं तरी पाणी उपसून बाहेर काढण्यासाठी वेगळी मेहनत असतेच. बहुधा अशाच एका गावातील पठ्ठ्याने हा हटके शोध लावला असावा. या तरुणाने विहिरीतून पाणी काढण्यासाठी गाडीचे टायर्स, विटा, रबराच्या ट्यूब व काही टाकाऊ वस्तूंचा वापर करून एक कमाल सिस्टीम बनवली आहे. या विना वीज, विना पॉवर चालणाऱ्या मशीनचे काम पाहून नेटकरी सुद्धा थक्क झाले आहेत.
लहान मुलांच्या पार्कमध्ये तुम्ही सी-सॉ प्रकार पहिला असेल. एकीकडे वजन जास्त झाले की दुसरी बाजू वर येते. आता हाच सामान्य विज्ञानाचा नियम वापरून या पठ्ठ्याने विहिरीतून पाणी काढण्यासाठी शक्कल लढवली आहे. एका बाजूला जड विटा ठेवून दुसरीकडे पाणी काढण्यासाठी छोटी बादली लावली आहे. मग या बादलीतील पाणी खेचण्यासाठी ट्यूब लावली आहे. हा जुगाड आता तुम्ही प्रत्यक्षच पाहा…
Video : विहिरीतून पाणी काढण्यासाठी असं भन्नाट डोकं लावलं
हे ही वाचा<< ऑस्कर विजेत्या ‘नाटु नाटु’ गाण्याचा मराठी अर्थ माहितेय का? मग कीरावनी व चंद्रबोस यांचा ‘हा’ Video बघाच
हा व्हिडीओ @incomehacks.in या अकाऊंटवर शेअर करण्यात आला होता. हा व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल २९ लाख २५ हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून या हुशार तरुणाचे कौतुक केले आहे. तुम्हाला हा जुगाड कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा.