Man Making Reel Crushed To Death By Elephant: हत्तीला पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी मानलं जातं. हत्तींचं वजन हजारो किलोंमध्ये असतं. हा प्राणी आपल्या पायाखाली काहीही दाबून त्याचा विनाश करू शकतात. अनेकदा हा प्राणी माणसांसोबतही राहातो, मात्र शेवटी तो आहे जंगलीच. त्यामुळे हा प्राणी जंगलात राहिलेलंच अधिक चांगलं असतं. जंगलातून प्रवास करत असताना अनेक हिंस्र प्राण्यांचा सामना करावा लागतो. अशातच वाघ, सिंह, हत्तीसारखे प्राणी समोर दिसल्यावर अनेकांची पळता भुई झाल्याशिवाय राहत नाही. प्राण्यांच्या हल्ल्याचे व्हिडिओ अतिशय भयानक आणि थरकाप उडवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पिसाळलेल्या हत्तीने व्हिडीओ बनवणाऱ्या तरुणाला चिरडून ठार केले आहे. या तरुणाचा पंधरा सेकंदात झालेल्या वेदनादायक मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा