Viral Video Today: असं म्हणतात काही प्राण्यांना नैसर्गिक आपत्तीचे संकेत सर्वात आधी मिळतात, तसेच वातावरणात झालेला बदल एखाद्या माणसाचं दुःखही हे प्राणी आधी ओळखू शकतात. पण आपल्याला भूत दिसलं असा कुणी दावा केला तर? विश्वास बसणार नाही ना? सोशल मीडियावर असाच एक अविश्वसनीय व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे एका हॉस्पिटलच्या CCTV फुटेज मध्ये एक सुरक्षा रक्षक चक्क एका अदृश्य माणसाशी गप्पा मारताना पाहायला मिळत आहे. घोस्ट पेशंट म्हणजेच रुग्णाच्या भुताशी हा माणूस गप्पा मारत असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण? चला तर पाहुयात…

अर्जेंटिनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अतिशय विचित्र कारणामुळे चर्चेचा मुद्दा बनला आहे. यात रुग्णालयातील सुरक्षा रक्षक न दिसणार्‍या व्यक्तीशी बोलत असल्याचे दाखवले आहे. हा व्हिडिओ Reddit वर शेअर करण्यात आला असून त्याला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.

Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”
Image Of Harsh Goenka.
L&T Chairman : “रविवारचे नाव ‘Sun-Duty’ करा”, रविवारीही काम करण्याचा सल्ला देणाऱ्या एल अँड टी च्या अध्यक्षांना अब्जाधीशाचा टोला
Bigg Boss 18 Vivian Dsena for dragging Chum Darang during Ticket to Finale Task
Video: कधी लाथ मारली, तर कधी चुमला फरफटवलं; विवियन डिसेनाचा आक्रमकपणा पाहून नेटकरी म्हणाले, “आम्ही तुझ्या पाठिशी…”
HMPV Nagpur , HMPV suspects Nagpur,
नागपुरातील ‘एचएमपीव्ही’ संशयितांची तपासणी लांबणीवर, एम्स रुग्णालय…
VIDEO : “माझी प्रकृती खूप…”, ‘तारक मेहता का…’ फेम गुरुचरण सिंगला केलं रुग्णालयात दाखल; अभिनेता म्हणाला…

Reddit वापरकर्त्याने व्हिडिओ शेअर करताना लिहिलेल्या कॅप्शननुसार, हे फुटेज रात्री 3 वाजता रेकॉर्ड करण्यात आले होते. व्हिडिओमध्ये एक सुरक्षा रक्षक सुरुवातीला रिसेप्शनवर बसलेला दिसतो जेव्हा. इतक्यात हॉस्पिटलमध्ये प्रवेशाचा स्वयंचलित दरवाजा उघडतो. या फुटेजमध्ये दरवाजा उघडल्यावर कोणीही आत जाताना दिसत नाही. मात्र इतक्यात हा सुरक्षा रक्षक जागेवरून उठतो व त्या अदृश्य व्यक्तीकडे जाऊन त्याची माहिती विचारू लागतो.

आपण हा व्हिडीओ कॅमेरा खराब आहे म्हणूनही दुर्लक्षित करू शकत नाही कारण केवळ त्या व्यक्तीशिवाय अन्य सर्व गोष्टी इतकंच काय तर त्या सुरक्षा रक्षकाच्या हातातील नोटपॅड व पेनही यात स्पष्ट दिसत आहे. डेली स्टार रिपोर्टच्या माहितीनुसार जेव्हा हा सुरक्षा रक्षक त्या रुग्णाचे तपशील लिहून घेतो तर ते तपशील याच हॉस्पिटलमध्ये काही दिवसांपूर्वी मृत्यू झालेल्या रुग्णाशी मिळते जुळते होते.

.. अन तो रुग्णाच्या भुताशी बोलू लागला

हे ही वाचा<< माझं बाळ मला हसलं अन.. ११४ किलोची ‘ती’ आई ५३ किलोची झाली! शेअर केलं संपूर्ण नैसर्गिक डाएट

दरम्यान, हा नेमका प्रकार काय आहे याची अद्याप पुष्टी झालेली नाही. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी केलेल्या कमेंटनुसार हा त्या सुरक्षा रक्षकाने केलेला प्रॅन्क असावा असा अंदाज आहे.

Story img Loader