Man Spent Rs 12 Lakh To Become A Dog: गेल्या वर्षी, एका जपानी व्यक्तीने तब्बल १२ लाख रुपये खर्च करून स्वतःला ‘कोली’ या कुत्र्याच्या जातीत रूपांतरित केले होते. कुत्र्याची आवड असेल तर एखादा माणूस छान गोंडस कुत्र्याचं पिल्लू पाळेल किंवा फ्री पेंटिंग झू सारख्या ठिकाणांना भेट देईल पण आवड म्हणून कोणी स्वतः कुत्रा का बनेल? बरं त्यासाठी १२ लाख खर्च करणं हा प्रश्न जवळपास वर्षभर अनेकांना छळत होता. याच प्रश्नाचे उत्तर आता स्वतः या माणसाने दिले आहे.

सर्वात आधी जर तुम्ही हा विचार करत असाल की हा माणूस नेमका कुत्र्यात रूपांतरीत झाला कसा? मंडळी या माणसाने स्वतःसाठी कुत्र्याचा पोशाख बनवला आहे. झेपेट एजन्सीने ४० दिवस २ मिलियन येन (£१२,५००) खर्च करून बेस्पोक पोशाख तयार केला. टोको-सान याने या पोशाखात आपले फोटो व व्हिडिओ शेअर केले आहेत तो सांगतो की ” हे कपडे जेव्हा मी ते घातले तेव्हा ते खऱ्या कुत्र्याप्रमाणेच दिसतात.” तुम्हाला ही व्हिडीओ पाहून याचा अंदाज येईलच.

या माणसाने सांगितले की लहानपणापासूनच त्याला प्राणी बनण्याची खूप इच्छा होती. यासाठीच त्याने स्वतःचे रूपांतर एका कोली जातीच्या कुत्र्यात केले.त्याने आपल्या कुत्र्याचे नाव टोको ठेवले आहे. YouTube वर काही प्रश्नांची उत्तरे देताना तो सांगतो की, “माणसांमध्ये व प्राण्यांमध्ये आकाराचा अगदी शुल्लक फरक आहे. कुत्र्यांना भाडे, प्रवास किंवा नेटवर्क कुठलाच खर्च करण्याची आवश्यकता नसते. त्यातही कोली ही माझी आवडती प्रजाती आहे. कुत्र्याचे गोंडस रूप मला जगता येत आहे यामुळे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे.”

..म्हणून मी कुत्रा झालो

हे ही वाचा<< “मी रात्री असाच नाचणार कारण.. ” आनंद महिंद्रा यांनी Video ट्वीट करून फॉलोवर्सना केलं खुश

दरम्यान अलीकडेच एका माणसाने टोको प्रमाणेच स्वतःला लांडग्याच्या रूपात बदलण्यासाठी तब्बल १८ लाख रुपये खर्च केले होते.

Story img Loader