सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही रील हसवणारे, काही भावुक करणारे, तर काही विचित्र , तर काही अगदीच काळजाचा ठोका चुकवणारे असतात. तर सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ; जो कदाचित पाहिल्यानंतर तुम्हाला थोडी भीतीही वाटेल. तर व्हायरल व्हिडीओत एक व्यक्ती झाडावर बसूनच झाडाचा शेंडा कापताना दिसत आहे. चला तर पाहुयात काय आहे या व्हिडीओत खास.
तर व्हायरल व्हिडीओत एक व्यक्ती नारळाच्या झाडाचा शेंडा तोडत असते. कोणतेही सुरक्षेच साधन बरोबर न घेता ही व्यक्ती नारळाच्या उंच झाडावर चढते आणि बसते. तसेच इलेक्ट्रिक साधन घेऊन झाडाच्या शेंडा मधोमध कापते. व्यक्ती झाडावर बसून हा कापलेला शेंडा स्वतःच्या हातात अलगद झेलते. तुम्हीसुद्धा पाहा व्यक्तीची ही अनोखी शैली..
व्हिडीओ नक्की बघा :
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, व्यक्ती चक्क या उंच नारळाच्या झाडावर बसून झाडाचा शेंडा कापत आहे आणि शेंडा तुटून खाली पडल्यानंतर त्याला सहज हातात झेलते आहे व अगदी सहजपणे ती उंचावरून खाली फेकून देते आहे. करवतीने कापल्यानंतर शेंडा एका बाजुला व्यक्तीनं फेकला आणि उर्वरित झाड वेगळे झाले. तेव्हा एका क्षणासाठी वाटतं की, तो माणूस देखील झाडाच्या शेंड्याबरोबर दुसरीकडे फेकला जाईल. पण तो, तसाच झाडावर बसून असतो ; जे पाहून तुम्हाला नवल वाटल्याशिवाय राहणार नाही.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @144p_cutz या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्यक्तीची अनोखी शैली आणि त्याचा सराव पाहून नेटकरी विविध शब्दात त्याचे कौतुक करत आहे. एका नेटकाऱ्याने कमेंट केली आहे की, ‘ पीएचडीपेक्षा अनुभव नेहमीच महत्वाचा असतो’. तर एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांच लक्ष वेधून घेतलं आहे.