Viral Video: भारतीयांना क्रिकेटचं जसं वेड आहे तसं पाश्चिमात्य देशात बास्केटबॉल हा खेळ अत्यंत प्रसिद्ध आहे. अनेकजण वर्षानुवर्षे मेहनत करून बास्केटबॉलमध्ये सिद्धी प्राप्त करण्यासाठी झटत असतात. आणि मग त्याच मेहनतीतून, सरावातुन एखादा हरहुन्नरी हिरा बाहेर येतो. टेक्सामधील अशाच एका बास्केटबॉलपटूने अलीकडेच आपल्या खेळातून विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. ३० व्या वर्षी या बास्केटबॉल खेळाडूची दखल घेत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्याला गौरवले आहे. या खेळाडूचा विक्रम केवळ अधिक सामने खेळण्याचा किंवा अधिक बास्केट करण्याचा नाही तर त्याहूनही भन्नाट आहे.
गिनीज बुकच्या माहितीनुसार या खेळाडूने ५ इंच लांबून बॉल वर फेकत तब्बल ८५ फुटावरून बास्केट मध्ये टाकला. त्याच्या या विक्रमाचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, हा आतापर्यंतचा ‘सर्वात दूरचा बास्केटबॉल शॉट’ आहे. याची उंची २६.०६ मीटर (८५ फूट ५ इंच) असून जेरेमी वेअर या ३० वर्षीय खेळाडूने सॅन अँटोनियो, टेक्सास येथे २९ जानेवारी २०२३ ला विक्रम केला. एनबीएच्या सॅन अँटोनियो येथे असलेल्या AT&T सेंटरमध्ये या विक्रमाचा क्षण रेकॉर्ड करण्यात आला.
Video: ८५ फूट लांबून बास्केटबॉल
हे ही वाचा<< हा चिमुकला आहे की वादळ? बास्केटमध्ये बसून उंच जिन्यावर खेळायला गेला, धडाम करून पडताच जे बोलू लागला…
जेरेमी सांगतो की, “मी २०१० पासून बॅकवर्ड बास्केटबॉल शॉट्सचा सराव करत होता. मला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड वाचून बास्केटबॉलमध्ये विक्रम करण्याची इच्छा होती. हायस्कूलमध्ये, मी बॅकवर्ड बॉल मारण्याचा सराव केला पण तो केवळ मनोरंजनासाठी होता. १२ वर्षांनंतर, मला लक्षात आले की सर्वात दूरच्या बास्केटबॉल बॅक शॉटचा एक विक्रम आपणही मोडू शकतो. त्यानंतर माझी दृष्टी लक्ष्यावर ठेवून मी आज ते ध्येय साध्य करू शकलो.