Viral Video Today: वाघ जंगलाचा राजा, सिंह शक्तीचा राजा, हत्ती बुद्धीचा राजा आणि मगर म्हणजे… थरकाप उडवणारी पाण्यात व जमिनीवर दोन्हीकडे राज्य करणारी महाराणी. अतिशयोक्ती वाटेल पण अनेकदा जंगलातील भलेमोठे प्राणी सुद्धा मगरीसमोर पंगा घ्यायला कच खातात. कितीतरी वेळा मगरीने प्राण्याला पार फाडून खाल्ल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात मात्र तरीही काही हौशी मंडळी त्यातून शिकवण घेत नाहीत. आता सोशल मीडियावर व्हायरल होणारा असाच एक व्हिडीओ नेटकऱ्यांचा थरकाप उडवत आहे. बाकी सगळं जाऊदे पण या माणसाने मगरीला पकडायला चक्क टीशर्ट वापरलं हीच बाब अनेकांच्या विचारापलीकडची ठरत आहे. या टीशर्ट घेऊन आलेल्या हुशार व्यक्तीला मगरीने दिलेला प्रतिसाद पाहून तर तुम्हीही थक्क व्हाल, नेमका काय आहे हा व्हिडीओ चला तर पाहुयात…
तर झालं असं की, एक वयस्कर व्यक्ती मगरीला पकडायला गेल्याचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. जेवढं तुम्हाला वाचताना जाणवत असेल त्याहून १० पट अधिक असा हा भयंकर अनुभव सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मगरीला पकडायला टीशर्ट घेऊन गेलेला हा माणूस सुरुवातीला इतका आत्मविश्वासाने एक एक पाऊल पुढे टाकतो की ते बघून आपल्यालाही आज हा मगर पकडतोच असे वाटू शकते. तो आधी मगरीच्या डोक्यावर टीशर्ट टाकतो, साहजिकच मगर आधी काय झालं म्हणून इकडे तिकडे बघू लागते.
आपल्या डोक्यावर उभा असणारा हा माणूस दिसताच आधी एक सेकंद मगर शांतपणे त्याला बघते आणि मग जबडा उघडून थेट त्याचा हात धरू लागते. अर्थात इथे आपला प्लॅन फसल्याची जाणीव या महाशयांना झाली असावी म्हणून ते पळ काढण्याचा प्रयत्न करतात पण तितक्या महाकार मगरीसमोर त्याचा पाय घसरतो व तो माणूस खाली पडतो, मगर सुद्धा हीच संधी साधून त्याच्यावर हल्ला चढवू पाहते, शेवटी हा माणूस सरपटत मागच्या बाजूने पळून जाण्यात यशस्वी होतो.
मगरीला धरायला टीशर्ट नेलं अन…
हे ही वाचा<< Video: देवाची करणी अन.. ; ४ भल्या मोठ्या बैलांनी एकट्या माणसाला घेरलं, हल्ला करणार इतक्यात समोरून..
दरम्यान हा व्हायरल व्हिडीओ आतापर्यंत लाखो नेटकऱ्यांनी पाहिला आहे. जर आपल्याला योग्य प्रशिक्षण नसेल तर हे जीवघेणे प्रकार करायची गरजच काय असा प्रश्न नेटकऱ्यांनी या व्हिडिओतील माणसाला केला आहे.