अंकिता देशकर
Man Falls In Pothole Disappears Video: उत्तर भारतातील विविध भागांमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पावसामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या सर्व व्हिडिओंमध्ये, लाइटहाऊस जर्नलिझमला एक व्हिडिओ सापडला ज्यामध्ये एक माणूस अचानक चालत असताना खड्ड्यात पडून काही सेकंदात गायब होताना दिसत आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या व्हिडिओचा नीट तपास केल्यावर वेगळेच सत्य समोर आले आहे. नेमकं हा प्रकार काय, चला जाणून घेऊया…
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर Archana Singh ने हा व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर यूजर देखील हा व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही हा व्हिडिओ नीट पाहिला असता या व्हिडिओमध्ये काही गोष्टी आम्हाला जाणवल्या.
१. हा व्हिडिओ सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सारखा दिसत नव्हता
२. जर का हा व्हिडिओ कोणी शूट करत असेल आणि अशी घटना घडली असती, तर कॅमेरामनने नक्कीच याठिकाणी गोंधळ घातला असता.
३. जो व्यक्ती डबक्यात पडला त्याच्या शारीरिक हालचाली देखील बदलले नाही.
आम्ही काही कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च वापरून व्हिडिओ शोधला. आम्हाला हा व्हिडिओ GIF स्वरूपात Tenor वर सापडला.
आम्ही GIF वर दिलेला मथळा वापरून शोधला आणि kulfyapp.com वर देखील GIF सापडला.
आम्ही Kulfy ऍपबद्दल अधिक शोधले आणि आढळले की ते GIF तयार करण्यासाठी, शोधण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी वापरले जाते.
आम्हाला CINE 24 VFX या YouTube चॅनेलवर असाच व्हिडिओ बनवताना आढळला
व्हायरल झालेला व्हिडिओ कसा बनवला गेला असेल हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
आम्ही व्हायरल व्हिडिओ संदर्भात अधिक माहिती साठी डिजिटल एडिटर सारंग निमखेडकर यांना संपर्क केला. त्यांनी सांगितले की व्हिडिओचा पहिला भाग हा रॉ फुटेजचा भाग असून, दुसऱ्या भागाला स्केल आणि मास्क देऊन ऍनिमेट करण्यात आले आहे.
निष्कर्ष: व्हायरल व्हिडिओ ज्यामध्ये एक माणूस डबक्यात गायब होताना दिसतो तो डिजिटल पद्धतीने तयार केलेला आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ खरा नाही.